Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

डोंगर उतारावर राहणाऱ्यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे पालिकेचे आवाहन

पावसाळ्यादरम्यान दरडी कोसळण्याची, डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची, तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 30, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
डोंगर उतारावर राहणाऱ्यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे पालिकेचे आवाहन
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता, डोंगरावरून वाहत येणारा पाण्याचा लोंढा, आदींमुळे भूस्खलन होण्याचा धोका लक्षात घेऊन विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या ठिकाणी डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, स्थलांतर न करता तेथेच वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांची जबाबदारी त्यांची स्वत:ची असेल. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे एन विभागाचे सहायक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

पावसाळ्यादरम्यान दरडी कोसळण्याची, डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची, तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात. एन विभाग कार्यालय हद्दीतील विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या भागांतील धोकादायक इमारतींना / झोपड्यांना एन विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना / नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित भागातील स्थानिक रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

७२ एक्सप्रेस आणि ९५६ लोकल रद्द; ३ दिवसांचा मुंबई ठाण्यात मेगा ब्लॉक

Next Post

टीएमटीसह लालपरी मेगा ब्लॉकसाठी सज्ज, अतिरिक्त बस उपलब्ध

Next Post
मुंबईत महागाईचा भडका; तिकीट दरात होणार वाढ, बेस्ट बसचा प्रवास आणखी महागणार

टीएमटीसह लालपरी मेगा ब्लॉकसाठी सज्ज, अतिरिक्त बस उपलब्ध

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.