Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ओला, सुका कचरा वेगळा न दिल्यास कारवाई; पिंपरी महापालिकेचा इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 10, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
ओला, सुका कचरा वेगळा न दिल्यास कारवाई; पिंपरी महापालिकेचा इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांतील नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा एकत्र दिला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वतंत्र निरीक्षण पथके नियुक्त केली आहेत. ही पथके दररोज कचरा संकलनावेळी कचरा वेगळा केला आहे की नाही, याची तपासणी करणार आहेत. कचरा वेगळा न करणारे नागरिक, गृहनिर्माण सोसायट्यांवर, व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा घटांगाडीमार्फत संकलित केला जातो. मोशीतील कचरा डेपो येथे हा कचरा टाकला जातो. शहरात दरराेज ओला आणि सुका असा सरासरी १३०० टन कचरा संकलित केला जातो. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार प्रत्येक नागरिकाने घरगुती तसेच व्यावसायिक कचरा वेगळा करून देणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांमधून नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांमध्ये ‘कचरा वेगळे करणे हीच खरी स्वच्छतेची गुरुकिल्ली आहे’ अशी जाणीव दृढ केली जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. महापालिकेने कचरा वेगळा करण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण सोसायट्या आणि संस्थांना दोन वेगवेगळ्या रंगांचे डबे दिले आहेत. त्यांचा योग्य वापर केल्यास कचऱ्याचे प्रभावी वर्गीकरण होईल. या प्रक्रियेमुळे पुढील टप्प्यांमध्ये कंपोस्टिंग, पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती सुलभ होईल. त्यामुळे नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून स्वच्छ, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक शहरनिर्मितीत सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले आहे.

Previous Post

शिवाजी पार्कच्या मैदानातील मातीवर तोडगा काढण्यासाठी खेळाडूंचे पालिका प्रशासनाला पत्र

Next Post

ठाण्यातील दांपत्याचे प्रेरणादायी लक्ष्य, दिल्ली ते मुंबई ‘गेट टू गेट’ सायकलिंग मोहिम!

Next Post
ठाण्यातील दांपत्याचे प्रेरणादायी लक्ष्य, दिल्ली ते मुंबई ‘गेट टू गेट’ सायकलिंग मोहिम!

ठाण्यातील दांपत्याचे प्रेरणादायी लक्ष्य, दिल्ली ते मुंबई ‘गेट टू गेट’ सायकलिंग मोहिम!

BreakingNews

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.