Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

शिवाजी पार्कच्या मैदानातील मातीवर तोडगा काढण्यासाठी खेळाडूंचे पालिका प्रशासनाला पत्र

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 10, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
शिवाजी पार्कच्या मैदानातील मातीवर तोडगा काढण्यासाठी खेळाडूंचे पालिका प्रशासनाला पत्र
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानातील मातीच्या प्रश्नावर गेल्या सात – आठ वर्षांत तोडगा काढण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणांना आता प्रत्यक्ष मैदानात खेळायला येणाऱ्या खेळाडूंनीच पत्र पाठवले आहे. संपूर्ण मैदानाची दुरुस्ती, सपाटीकरण आणि देखभाल करावी, अशी मागणी या खेळाडूंनी मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिका, आयआयटीचे तज्ज्ञ, एमपीसीबीचे सदस्य तसेच शिवाजी पार्कचे रहिवासी यांची रविवारी बैठक होणार आहे. राजकीय पक्षांच्या सभांनी गाजलेले शिवाजी महाराज मैदान गेल्या काही वर्षापासून धुळीच्या समस्येमुळे चर्चेत आले आहे. खेळाडूंसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या या मैदानातील उडणारी लाल माती येथील रहिवासी व खेळाडूंसाठी त्रासदायक ठरत आहे. गेल्या आठ – दहा वर्षांपासून धुळीचा प्रश्न सोडवण्यासाठी रहिवाशांचे आंदोलन सुरू असून अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मैदानातील मातीचा मुद्दा तापला होता. दरवर्षी हिवाळा आला की मैदानातील माती वाऱ्याबरोबर उडते. त्यामुळे हिवाळ्याच्या तोंडावर हा मुद्दा अधिकच चर्चेत येतो. आतापर्यंत रहिवाशांनी अनेकदा आंदोलने करूनही या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्यामुळे आता परळ, दादर, माहीम परिसरातून या मैदानात खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंनीच एक पत्र मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाला पाठवले आहे. मैदानात विविध क्लबच्या आठ खेळपट्ट्या आहेत. हे क्लब आपापल्या परिसराची देखभाल व स्वच्छता करतात. मात्र त्याव्यतिरिक्त मैदानाचा परिसर दुर्लक्षितच असतो. छत्रपती शिवाजी माहाराज पार्क हे केवळ एक खेळाचे मैदान नसून मुंबईच्या इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. हे मैदान तरुण खेळाडूंच्या नियमित सरावाचा अविभाज्य भाग आहे. मात्र मैदानाचा पृष्ठभाग खराब झाल्यामुळे सराव करताना खेळाडूंना अडचणी येतात. तसेच धूळ उडते. अस्वच्छतेमुळे आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याचे खेळाडूंनी पत्रात म्हटले आहे. मैदानाच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी नियमित स्वच्छता व देखभाल उपक्रम राबवावेत, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची व्यवस्था करावी, संपूर्ण मैदानाचे सपाटीकरण करावे आदी मागण्या पत्रात करण्यात आल्याची माहिती येथे नियमित येणारे खेळाडू समीर गायकवाड यांनी दिली.

Previous Post

कोथरुडमधील फसवणूकप्रकरणी भोंदूबाबासह तिघांना ठोकल्या बेड्या

Next Post

ओला, सुका कचरा वेगळा न दिल्यास कारवाई; पिंपरी महापालिकेचा इशारा

Next Post
ओला, सुका कचरा वेगळा न दिल्यास कारवाई; पिंपरी महापालिकेचा इशारा

ओला, सुका कचरा वेगळा न दिल्यास कारवाई; पिंपरी महापालिकेचा इशारा

BreakingNews

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.