Lokrakshanay
Friday, August 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मोबाईलने वाहनांचे छायाचित्र काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाईचे आदेश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 9, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
मोबाईलने वाहनांचे छायाचित्र काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाईचे आदेश
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र खासगी मोबाईलने काढून सोयीनुसार ई-चलान जारी करणाऱ्या पोलिसांवर आता शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी परिपत्रकाद्वारे कारवाईचे आदेश दिले आहेत. वाहतूक संघटनांकडून आलेल्या तक्रारीनंतर राज्य पोलीस दलाने याबाबतचे आदेश जारी केले.

वाहतूक पोलिसांना ई-चलान यंत्रणा दिली असतानाही अनेक वाहतूक पोलीस खासगी मोबाईलवरून वाहनांचे छायाचित्र काढून ते त्यांच्या सवडीनुसार ई-चलान यंत्रणेत टाकतात. खासगी मोबाईलद्वारे एकाचवेळी मोठ्या संख्येने वाहनांचे छायाचित्र काढली जातात. याबाबत परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे वाहतूक विभागाकडून नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार वाहतूक नियमभंगाची कारवाई करताना ई-चलान यंत्रणेद्वारेच छायाचित्र पोलिसांना काढावे लागणार आहे. वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी या संदर्भात आदेश नुकताच जारी केला. २ जुलैला परिवहन मंत्र्यांबरोबर विधान भवनात वाहतूक संघटनांची बैठक पार पडली. वाहतूक पोलिसांनी कारवाई करताना खासगी मोबाईलचा वापर करू नये, याबाबत यापूर्वीच सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही अनेक अधिकारी, कर्मचारी खासगी मोबाईलवर छायाचित्र काढून ई-चलाना पाठवत आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची यावी, असे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी आदेशात नमूद केले आहे

Previous Post

महावितरणच्या अधिकाऱ्याकडून पोलीस अधीक्षकांची फसवणूक

Next Post

शिवसेनेच्या आमदाराकडून कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण, कोणी काही खाल्लं तर..

Next Post
शिवसेनेच्या आमदाराकडून कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण, कोणी काही खाल्लं तर..

शिवसेनेच्या आमदाराकडून कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण, कोणी काही खाल्लं तर..

BreakingNews

आता प्रत्येक आमदाराला मिळणार हक्काची गाडी आणि दरमहा १ लाख रुपये; तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

FDAच्या कडक कारवाईचा परिणाम; चायनीजमध्ये लाल रंगासाठी आता बीट आणि काश्मिरी मिरचीचा वापर

ठाण्यात आरटीओचे ‘मिशन मराठी’ला सुरुवात; पहिल्याच दिवशी ६ ठिकाणी तपासणी मोहीम!

वडा-पावऐवजी इडली-डोसा अन् कोलाऐवजी ताक; FDAच्या निर्देशानंतर शालेय कँटीनमध्ये आरोग्याला प्राधान्य

हॉकी विश्वचषकातही भारताचाच बोलबाला! पाकिस्तानचा ५-३ ने पराभव करत टॉप-८ मध्ये दमदार प्रवेश

मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच धावणार १५० नवीन आलिशान डबलडेकर एसी बसेस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.