Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; रुग्णवाहिकेतून गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

पिंपरी- चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 18, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; रुग्णवाहिकेतून गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. वेगवेगळ्या केलेल्या कारवाईत एकूण एक कोटी ३१ लाखांचा ९६ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपी हे रुग्णवाहिकेतून गांजा विक्री करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे, हनुमंत भाऊसाहेब कदम, देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे, सन्नीदेवल सिध्दार्थ शर्मा, सन्नीदेवल भगवानदास भारती आणि सौरभ निर्मल यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे आणि हनुमंत भाऊसाहेब कदम यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर ३० लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात २५ लाख ३९ हजार किमतीचा २५ किलो गांजा, चारचाकी आणि चार मोबाईलचा समावेश आहे. आरोपींनी गांजा देवी प्रसाद उर्फ देवा सीताराम डुकळे यांच्याकडून आणला होता. तो सौरभ निर्मल यास विकणार असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यांच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी देवी प्रसादलाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५० लाख २० हजारांचा ५० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे रुग्णवाहिकेतून गांजाची विक्री आणि डिलिव्हरी करत असल्याच तपासात समोर आले आहे. तसेच सन्नीदेवल सिध्दार्थ शर्मा आणि सन्नीदेवल भगवानदास भारती यांच्याकडून २० लाख ७९ हजारांचा २० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. असा एकूण १ कोटी ३१ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हा गांजा रूपीनगर चिखलीत विकणार असल्याचं समोर आलं आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक वैभव शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Previous Post

डॉ. सायरस के. मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून प्रतिष्ठित “भारतीय नेत्र शल्यचिकित्सक” पुरस्कार

Next Post

‘मुंबई फेस्टिवल’चे दरवर्षी आयोजन करणार – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Next Post
‘मुंबई फेस्टिवल’चे दरवर्षी आयोजन करणार – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

‘मुंबई फेस्टिवल’चे दरवर्षी आयोजन करणार – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

BreakingNews

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.