Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दुचाकीस्वाराची नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या पोलिसाला धडक

याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दुचाकीस्वाराला अटक करण्यात आली

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 27, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : बोरीवली पूर्व येथे नाकाबंदी दरम्यान एकाच दुचाकीवरून तिघे प्रवास करत असल्यामुळे पोलिसांनी रोखले असता आरोपी दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने दुचाकी चालवून सहाय्यक फौजदाराला धडक देऊन जखमी केले. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दुचाकीस्वाराला अटक करण्यात आली. दुचाकीस्वाराकडे हेल्मेट व चालक परवानाही नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदार वसंत सालकर (५०) हे पालघरमधील वसई येथील रहिवासी आहेत. ते सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत असून बोरीवली पूर्व येथील ओमकारेश्वर मंदिर येथे नाकाबंदीला तैनात होते. त्यावेळी इतर पोलीस अधिकारी व अंमलदारही उपस्थित होते. त्यावेळी आरोपी किरण माळी (२१) दुचाकीवरून तेथे येत होता. त्याच्या दुचाकीच्या मागे सुजल जाधव (२०) व सिद्धेश शिंदे (१९) हे दोघे बसले होते.

दुचाकीवरून तिघे प्रवास करत असल्यामुळे पोलिसांनी किरणला गाडी थांबवल्याचा इशारा केला. पण त्याने भरधाव वेगाने दुचाकी चालवून तक्रारादर सालकर यांना धडक दिली. त्यामुळे सालकर तेथेच खाली कोसळले. त्यामुळे त्याच्या उजव्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर किरणने तेथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे तैनात इतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे हेल्मेट व चालक परवाना नसल्यामुळे याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात भरधाव वेगाने गाडी चालवून पोलिसाला धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानतंर याप्रकरणी आरोपी चालक किरण माळी याला अटक करण्यात आली आहे. जखमी सालकर यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच आरोपीने मद्य प्राशन केले होते का? हे तपासण्यासाठी त्याचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Previous Post

सायबर चोरट्यांचा फसवणुकीचा ‘हा’ नवा प्रकार, ‘ऑनलाइन टास्क’पासून सावधान!

Next Post

शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले,आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

Next Post
शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले,आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले,आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.