Lokrakshanay
Saturday, October 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्तांसाठी दिलासा; पुणे जिल्ह्यातील १० तालुक्यांतील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 24, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
दुष्काळग्रस्तांसाठी दिलासा; पुणे जिल्ह्यातील १० तालुक्यांतील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : राज्यातील अनेक भागांमध्ये यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील १० दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरित करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत धान्य वितरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. दुष्काळामुळे रोजगार किंवा पाण्याच्या शोधात स्थलांतर करणाऱ्या नागरिकांनाही ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही रेशन दुकानातून बायोमेट्रिक पडताळणीनंतर धान्य मिळणार आहे. त्यामुळे स्थलांतरित लाभार्थ्यांनाही त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यात अडचण येणार नाही.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही नियमानुसार अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ देण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी रेशन कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार कार्ड जोडलेले असणे आवश्यक आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील पात्र असूनही रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना नवीन रेशन कार्ड देण्याची प्रक्रियाही प्रशासन राबविणार आहे. ‘मिशन सुधार’ अंतर्गत रद्द झालेल्या रेशन कार्डांचा आढावा घेऊन आवश्यक निर्णय घेतला जाणार असून, पात्र लाभार्थ्यांना वेळेत धान्य मिळावे यासाठी नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. धान्याचा काळाबाजार, साठेबाजी किंवा वितरणातील गैरव्यवहार रोखण्यासाठीही प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Previous Post

आता OTP पाहण्यासाठी मेसेजेस ॲप उघडावे लागणार?

BreakingNews

दुष्काळग्रस्तांसाठी दिलासा; पुणे जिल्ह्यातील १० तालुक्यांतील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

आता OTP पाहण्यासाठी मेसेजेस ॲप उघडावे लागणार?

AI तंत्रज्ञान आणि ५५ दिग्गज कलाकारांचा संगम; पहिल्यांदाच येतोय मराठीतील एआय (AI) चित्रपट ‘बागुलबुवा’!

‘पादचारी प्रथम’ अभियान; दादरमध्ये १२ अतिक्रमणे आणि ६० फेरीवाल्यांवर कारवाई

‘७६ लाख मतांच्या घोटाळ्याप्रकरणी २८ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा’; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात कारवाईची मागणी – प्रकाश आंबेडकर

स्विगीचे नवे फीचर लॉन्च: एकाच वेळी ५ वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करता येणार

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.