Lokrakshanay
Tuesday, July 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 8, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी, सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विद्या प्रसारक संस्था आणि संकल्प सेवा मंडळ यांच्या डी.एल.बी. डिग्री कॉलेजचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी महापौर नरेश मस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळणे, ही काळाची गरज आहे. शासन त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. ठाण्यात अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. येत्या काळात ठाण्याचा सर्वांगीण विकास होणारच, विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणही होईल, याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी शिक्षण क्षेत्रातील १९७२ साली पाहिलेले “केजी टू पीजी” हे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न निश्चित सफल होईल. या शिक्षण संकुलामध्ये स्मार्ट क्लासरूम, कम्प्युटर लॅब, ठाण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय, कॉलेज प्लेसमेंट व करियर गाईडन्स सेंटर त्याचबरोबर विधी महाविद्यालय, मास मीडिया व कम्युनिकेशन महाविद्यालय, अशी विविध महाविद्यालये सुरु होत आहेत. गरजूंना शिक्षण देण्याचे पुण्य काम या संस्थेतून होत आहे, असेच चांगले काम करीत राहा, शासन आपल्या पाठीशी निश्चित उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुप्रसिध्द आरजे अमित काकडे यांनी केले तर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

Previous Post

प्रभावी उपाययोजनांद्वारे पाणी टंचाईवर मात करावी – मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

‘क्रीडा संकुलाच्या माध्यमातून देशाचे नाव उज्वल करणारे खेळाडू घडावेत’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
‘क्रीडा संकुलाच्या माध्यमातून देशाचे नाव उज्वल करणारे खेळाडू घडावेत’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘क्रीडा संकुलाच्या माध्यमातून देशाचे नाव उज्वल करणारे खेळाडू घडावेत’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

BreakingNews

लाडकी बहीण ई-केवायसीला ६ महिन्यांची मुदतवाढ!

पेपरफुटीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार; दोषींना १० वर्षे तुरुंगवास अन् १० कोटी रुपयांचा दंड!

धर्मेंद्र प्रधानांनंतर नितीन गडकरी विरोधकांच्या निशाण्यावर? उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांची केंद्रीय मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी

कल्याण-डोंबिवलीत विनापरवाना पॉलीक्लिनिकवर छापा; १.०३ लाखांचा औषधसाठा जप्त करत FDAचा दणका

बस कंडक्टर ते भारतीय सिनेसृष्टीचे ‘थलायवा’; सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी येणार रुपेरी पडद्यावर?

गोपाळगड किल्ला अखेर शासनाच्या ताब्यात! पर्यटकांचा मुक्त प्रवेशाचा मार्ग मोकळा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.