Lokrakshanay
Wednesday, September 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या आधीच मान्य, गणेशभक्तांची गैरसोय टाळा” – मुख्यमंत्र्यांचे जरांगे पाटलांना आवाहन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 15, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
“मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या आधीच मान्य, गणेशभक्तांची गैरसोय टाळा” – मुख्यमंत्र्यांचे जरांगे पाटलांना आवाहन
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. मराठा आंदोलकांच्या जवळपास सर्वच मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या असून, उर्वरित काही मागण्या न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असल्यामुळे त्या केवळ राज्यघटना, न्यायालय आणि इतर संवैधानिक प्रक्रियेनुसारच सोडवता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या गणेशपर्व सुरू असताना मुंबईत आंदोलन करून गणेशभक्तांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अडचण निर्माण होईल, असे कोणालाही वाटू नये. आंदोलनाचा पुनर्विचार करून संवादाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. वर्षा निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, सरकारने चर्चेची दारे कधीही बंद केलेली नाहीत. राज्यघटनेच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्या मान्य करण्यास सरकार तयार आहे; मात्र कायदा, न्यायालयीन नियम किंवा घटनात्मक मर्यादांच्या बाहेरच्या मागण्या स्वीकारता येणार नाहीत. समान नागरी कायद्याबाबतही राज्य सरकारने समिती स्थापन केली असून, तिचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ब्रिक्स परिषदेत केवळ शाकाहारी भोजन देण्यात आल्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारच्या टीका संकुचित विचारसरणीतून होत असल्याचे सांगत त्यांनी ब्रिक्स परिषदेत विविध देशांनी अत्यंत संवेदनशील परिस्थितीत दिल्ली जाहीरनाम्याला दिलेली मान्यता हेच या बैठकीचे सर्वात मोठे यश असल्याचे नमूद केले. दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी पोलिसांनी आझाद मैदानावरील सामूहिक आंदोलनास परवानगी नाकारल्यानंतर आता आपण एकटेच मुंबईत जाणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. आपल्या सोबत केवळ चार जण, दोन रुग्णवाहिका आणि दोन वाहने असतील, असे त्यांनी सांगितले. मराठा समाजातील इतरांनी सध्या मुंबईत येऊ नये, योग्य वेळी बोलावले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले. गुरुवारी मुंबईत पोहोचून आमरण उपोषण सुरू करण्याचा त्यांचा निर्धार कायम असून, शनिवारी रात्रीपासून त्यांनी सलाइन घेणेही बंद केल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

७ वर्षांची प्रतीक्षा संपली! ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील ३४२ कुटुंबांना लवकरच मिळणार हक्काचे घर

Next Post

₹२००० च्या पुढील UPI पेमेंटवर चार्ज लागणार? केंद्र सरकारच्या ‘त्या’ पत्राने सगळंच बदललं!

Next Post
₹२००० च्या पुढील UPI पेमेंटवर चार्ज लागणार? केंद्र सरकारच्या ‘त्या’ पत्राने सगळंच बदललं!

₹२००० च्या पुढील UPI पेमेंटवर चार्ज लागणार? केंद्र सरकारच्या 'त्या' पत्राने सगळंच बदललं!

BreakingNews

कोकणातील जादा बसेसमुळे जिल्ह्यांतर्गत बससेवा कोलमडली; गाड्या अर्धा तास उशिराने

बाप्पाच्या स्वागताला ‘मोदक महोत्सव २०२६’ सज्ज; घरबसल्या मागवा स्वादिष्ट मोदक!

घरबसल्या खत बुकिंगला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद; २० दिवसांत २९० मेट्रिक टन खतांची विक्री!

२ हजारांपेक्षा जास्तच्या UPI पेमेंटवर १५ ऑक्टोबरपासून ०.४% शुल्क!

ठाण्यात विसर्जनानंतर गणेशमूर्तींचे फोटो काढण्यास बंदी; आदेश मोडल्यास थेट पोलिसांची कारवाई!

₹२००० च्या पुढील UPI पेमेंटवर चार्ज लागणार? केंद्र सरकारच्या ‘त्या’ पत्राने सगळंच बदललं!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.