Lokrakshanay
Wednesday, September 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

घरबसल्या खत बुकिंगला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद; २० दिवसांत २९० मेट्रिक टन खतांची विक्री!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 16, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
घरबसल्या खत बुकिंगला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद; २० दिवसांत २९० मेट्रिक टन खतांची विक्री!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल (FFS)’ या डिजिटल प्रणालीद्वारे ठाणे जिल्ह्यात खत विक्रीची प्रक्रिया यशस्वीपणे सुरू झाली असून शेतकऱ्यांना आता घरबसल्या खत बुक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. २७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अवघ्या २० दिवसांत FFS ॲपद्वारे २९० मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील ठाणेसह सात जिल्ह्यांमध्ये या नव्या प्रणालीची सुरुवात केली असून, जिल्हा परिषद ठाणे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तिची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, शेतकऱ्यांना योग्य वेळी आवश्यक खत उपलब्ध करून देणे आणि संपूर्ण व्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रणालीमुळे खत खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज कमी होणार असून शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्चाचीही बचत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व निविष्ठा विक्रेते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामसभांमधूनही शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे.

FFS ॲप Google Play Store वर उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ते डाउनलोड करून Agri Stack ID किंवा आधार क्रमांकाच्या माध्यमातून नोंदणी करायची आहे. Agri Stack ID द्वारे लॉगिन केल्यास जमिनीची माहिती आपोआप उपलब्ध होते, तर आधारद्वारे लॉगिन केल्यास ती स्वतः भरावी लागते. त्यानंतर आवश्यक खत निवडून जवळच्या कृषी सेवा केंद्राची निवड करता येते. बुकिंग पूर्ण झाल्यानंतर मिळणारा QR कोड तीन दिवसांसाठी वैध राहतो. या QR कोडच्या आधारे संबंधित विक्रेत्याकडून खत खरेदी करता येते. तीन दिवसांनंतर खत घ्यायचे असल्यास पुन्हा नवीन बुकिंग करावे लागते. शेतकऱ्यांना ॲप वापरताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तालुका आणि जिल्हास्तरावर हेल्प डेस्कचीही स्थापना करण्यात आली आहे. FFS प्रणालीमुळे खत बुकिंग आणि वितरण अधिक सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह झाले असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे.

Previous Post

२ हजारांपेक्षा जास्तच्या UPI पेमेंटवर १५ ऑक्टोबरपासून ०.४% शुल्क!

Next Post

बाप्पाच्या स्वागताला ‘मोदक महोत्सव २०२६’ सज्ज; घरबसल्या मागवा स्वादिष्ट मोदक!

Next Post
बाप्पाच्या स्वागताला ‘मोदक महोत्सव २०२६’ सज्ज; घरबसल्या मागवा स्वादिष्ट मोदक!

बाप्पाच्या स्वागताला 'मोदक महोत्सव २०२६' सज्ज; घरबसल्या मागवा स्वादिष्ट मोदक!

BreakingNews

बाप्पाच्या स्वागताला ‘मोदक महोत्सव २०२६’ सज्ज; घरबसल्या मागवा स्वादिष्ट मोदक!

घरबसल्या खत बुकिंगला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद; २० दिवसांत २९० मेट्रिक टन खतांची विक्री!

२ हजारांपेक्षा जास्तच्या UPI पेमेंटवर १५ ऑक्टोबरपासून ०.४% शुल्क!

ठाण्यात विसर्जनानंतर गणेशमूर्तींचे फोटो काढण्यास बंदी; आदेश मोडल्यास थेट पोलिसांची कारवाई!

₹२००० च्या पुढील UPI पेमेंटवर चार्ज लागणार? केंद्र सरकारच्या ‘त्या’ पत्राने सगळंच बदललं!

“मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या आधीच मान्य, गणेशभक्तांची गैरसोय टाळा” – मुख्यमंत्र्यांचे जरांगे पाटलांना आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.