Lokrakshanay
Wednesday, September 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात विसर्जनानंतर गणेशमूर्तींचे फोटो काढण्यास बंदी; आदेश मोडल्यास थेट पोलिसांची कारवाई!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 15, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
ठाण्यात विसर्जनानंतर गणेशमूर्तींचे फोटो काढण्यास बंदी; आदेश मोडल्यास थेट पोलिसांची कारवाई!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी महत्त्वाचा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या किंवा अर्धवट विरघळलेल्या मूर्तींचे फोटो काढणे, तसेच अशी छायाचित्रे प्रसिद्ध करणे किंवा सोशल मीडियावर प्रसारित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त पराग मणेरे यांनी हा आदेश जारी केला असून तो १५ सप्टेंबर २०२६ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण आयुक्तालयाच्या हद्दीत लागू राहणार आहे. यंदा १५, १६, १८, १९, २०, २१, २२, २५ सप्टेंबर, तसेच २६ सप्टेंबर (१३ दिवस) आणि ४ ऑक्टोबर (२१ दिवस) रोजी विविध गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. विसर्जनानंतर काही मूर्ती पूर्णपणे विरघळत नसल्याने त्या किनाऱ्यावर वाहून येतात किंवा पाण्यावर तरंगताना दिसतात. तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी या मूर्ती गोळा करत असतानाची छायाचित्रेही काही जणांकडून काढली जातात. अशा छायाचित्रांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची, सामाजिक सलोखा बिघडण्याची आणि सार्वजनिक शांततेला बाधा येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की अशा प्रकारची छायाचित्रे वृत्तमाध्यमे, सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक माध्यमांवर प्रकाशित अथवा प्रसारित करू नयेत. गणेश विसर्जनानंतरची दृश्ये चुकीच्या पद्धतीने वापरली जाऊन समाजात गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ नये, यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ मधील कलम २२३ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. या आदेशाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी सूचना फलक लावणे, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करणे तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. गणेशोत्सव शांततेत आणि धार्मिक भावना जपत पार पडावा, तसेच विसर्जनानंतरच्या दृश्यांचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये, यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

₹२००० च्या पुढील UPI पेमेंटवर चार्ज लागणार? केंद्र सरकारच्या ‘त्या’ पत्राने सगळंच बदललं!

Next Post

२ हजारांपेक्षा जास्तच्या UPI पेमेंटवर १५ ऑक्टोबरपासून ०.४% शुल्क!

Next Post
२ हजारांपेक्षा जास्तच्या UPI पेमेंटवर १५ ऑक्टोबरपासून ०.४% शुल्क!

२ हजारांपेक्षा जास्तच्या UPI पेमेंटवर १५ ऑक्टोबरपासून ०.४% शुल्क!

BreakingNews

बाप्पाच्या स्वागताला ‘मोदक महोत्सव २०२६’ सज्ज; घरबसल्या मागवा स्वादिष्ट मोदक!

घरबसल्या खत बुकिंगला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद; २० दिवसांत २९० मेट्रिक टन खतांची विक्री!

२ हजारांपेक्षा जास्तच्या UPI पेमेंटवर १५ ऑक्टोबरपासून ०.४% शुल्क!

ठाण्यात विसर्जनानंतर गणेशमूर्तींचे फोटो काढण्यास बंदी; आदेश मोडल्यास थेट पोलिसांची कारवाई!

₹२००० च्या पुढील UPI पेमेंटवर चार्ज लागणार? केंद्र सरकारच्या ‘त्या’ पत्राने सगळंच बदललं!

“मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या आधीच मान्य, गणेशभक्तांची गैरसोय टाळा” – मुख्यमंत्र्यांचे जरांगे पाटलांना आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.