Lokrakshanay
Monday, August 10, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लोणावळा ग्रामीणमध्ये गांजाची तस्करी उघड; ८.५ किलो गांजासह तरुणाला अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 10, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
लोणावळा ग्रामीणमध्ये गांजाची तस्करी उघड; ८.५ किलो गांजासह तरुणाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या कारवाईत ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आणि एक कार, असा एकूण ७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा गांजा विक्रीसाठी आणला होता की अन्य कोणत्या उद्देशाने जवळ बाळगला होता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, शुभम रमाकांत शर्मा (वय २३, रा. श्रमदान नगर, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ, जि. पुणे) हा कुसगाव बुद्रुक येथील आयआरबी कार्यालय परिसरात कारमधून गांजा विक्री करीत आहे. माहितीची खातरजमा केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित परिसरात सापळा रचला. संशयित व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेतल्यानंतर त्याची आणि त्याच्या ताब्यातील कार ची झडती घेण्यात आली. यावेळी कारमध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा ८ किलो ५०० ग्रॅम गांजा तसेच ३ लाख रुपये किमतीची हुंडाई आय-१० कार (क्र. एमएच १४ बीके ७२३५) जप्त केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ आणि मन:प्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणातील गांजाचा स्रोत आणि त्यामागील संभाव्य नेटवर्कचा तपास सुरू आहे.

Previous Post

लग्नसमारंभ, मिरवणुकांमध्ये पार्टी पॉपरवरील प्लास्टिक कन्फेटीवर बंदीची मागणी

BreakingNews

लोणावळा ग्रामीणमध्ये गांजाची तस्करी उघड; ८.५ किलो गांजासह तरुणाला अटक

लग्नसमारंभ, मिरवणुकांमध्ये पार्टी पॉपरवरील प्लास्टिक कन्फेटीवर बंदीची मागणी

“मराठी बोलताच आली पाहिजे!” १५ ऑगस्टनंतर रिक्षा-टॅक्सी चालकांची होणार परीक्षा – मंत्री सरनाईकांचा इशारा

ठाणे महापालिकेत ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्लास्टिकमुक्तीची जनजागृती

११ ऑगस्टपासून दुधाचे दर कडाडणार! दुधासह दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

SIR अंतर्गत मतदार गणनाअर्ज भरण्याची १७ ऑगस्ट हीच अंतिम तारीख!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.