Lokrakshanay
Sunday, August 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून जेठालाल बाहेर पडणार? निर्मात्यांनी अफवांवर दिले स्पष्ट उत्तर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 14, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून जेठालाल बाहेर पडणार? निर्मात्यांनी अफवांवर दिले स्पष्ट उत्तर
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ संदर्भात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः मालिकेतील जेठालाल हे लोकप्रिय पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी मालिका सोडणार असल्याच्या अफवांमुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. गेली १८ वर्षे प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करणाऱ्या या मालिकेने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिकेतील अनेक कलाकार कालांतराने बदलले, तर काही नव्या कलाकारांनीही शोमध्ये प्रवेश केला. तरीही जेठालाल हे पात्र सुरुवातीपासून मालिकेचा प्रमुख आधार राहिले असून, त्यांच्या विनोदी अभिनयामुळे हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. त्यामुळे दिलीप जोशी मालिकेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, या सर्व चर्चांवर आता मालिकेच्या निर्मात्यांनी पूर्णविराम दिला आहे.

आज तकशी संवाद साधताना मालिकेच्या निर्मात्यांनी स्पष्ट केले की, दिलीप जोशी मालिका सोडत नसून जेठालाल हे पात्रही कायम राहणार आहे. त्यांनी सांगितले की, मालिकेची कथा आजही जेठालालभोवतीच फिरत असून, त्यांच्या भूमिकेला कोणताही धोका नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पसरलेल्या सर्व अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, २८ जुलै रोजी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचा १८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, मालिकेचा नवीन प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये जेठालाल आणि तारक मेहता धावपळ करताना दिसत आहेत. जेठालाल दुकान उघडण्यासाठी पोहोचल्यावर दुकानाला कुलूप लागलेले दिसते आणि त्यानंतर दंड भरावा लागू नये म्हणून त्यांची सुरू होणारी धावपळ विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली आहे. या नव्या कथानकामुळे आगामी भाग प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक ठरणार असल्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे जेठालाल शो सोडणार असल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, दिलीप जोशी यांच्यासह मालिका पूर्वीप्रमाणेच प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहणार आहे.

 

Previous Post

हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर आता २०% कर! डोनाल्ड ट्रम्प यांचा जागतिक व्यापाराला झटका

Next Post

राज्यातील १९ महाविद्यालयांमध्ये १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प; कामांना गती देण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

Next Post
राज्यातील १९ महाविद्यालयांमध्ये १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प; कामांना गती देण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

राज्यातील १९ महाविद्यालयांमध्ये १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प; कामांना गती देण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

BreakingNews

ठाण्यात रिंग मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; ३० ऑगस्टला स्वाक्षरी मोहीम!

ChatGPT घेऊन आले ‘शेड्यूल टास्क’ फीचर; रोजची कामे आता एका क्लिकवर ऑटोमॅटिक होणार

‘कर्मचारी हेच आमचे कुटुंब’ – महापौर रितू तावडे; कर्मचाऱ्यांना राखी बांधत व्यक्त केली कृतज्ञता

खारघर हादरले! झेरॉक्स दुकानात सापडले ३,४०० अधिकृत मतदार फॉर्म

“तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित!”; ८ हजार राख्यांद्वारे पुणेकरांनी मानले देशरक्षकांचे आभार

मुलांच्या आधारचे बायोमेट्रिक अपडेट वेळेत करा; पालकांना जिल्हा परिषदेचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.