Lokrakshanay
Sunday, July 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन परिपत्रक जारी होणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 10, 2026
in ताज्या बातम्या, नागपूर, पुणे
विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : विदर्भातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत घेतलेल्या निर्णयात मोठा बदल झाला आहे. यापूर्वी विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा आदेश रद्द करत विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने विदर्भातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. शिक्षण संचालनालयाने ९ जून रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार शाळा २२ जूनपासून सुरू करण्याची भूमिका शासनाने न्यायालयासमोर मांडली होती. मात्र, याचिकाकर्त्यांच्या वतीने शासनाच्या भूमिकेला विरोध करण्यात आला.

न्या. अनिल किल्लोर आणि न्या. राजेश वाकोडे यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिक्षण विभागाच्या भूमिकेवर असहमती दर्शवली. न्यायालयाने १५ जून आणि २२ जूनपासून शाळा सुरू करण्यासंदर्भातील शिक्षण संचालकांचा आदेश रद्द केला असून, २० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसार शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता विदर्भातील सर्व शाळा ३० जूनपासून सुरू कराव्या लागणार आहेत. दरम्यान, न्यायालयाचा अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार नवीन परिपत्रक जारी करण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे. या निर्णयामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना उष्णतेच्या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासा मिळाला असून शिक्षण विभागालाही नव्याने नियोजन करावे लागणार आहे.

 

Previous Post

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

Next Post

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BreakingNews

‘एसआयआर’च्या कामाचा अकरावीच्या शिक्षणावर परिणाम; संस्थाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण

वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच एअर ॲम्ब्युलन्स; गंभीर भाविकाला सोलापूरला विमानाने हलवले

थलपथी विजयच्या ‘जन नायकन’ची दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी ७८.२७ कोटींची जागतिक कमाई

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्या, नाहीतर आंदोलन सुरूच राहणार! वांगचुक यांच्या उपोषणानंतर अभिजीत दिपकेंचा इशारा

आता बाहेरून औषधं घेता येणार; खासगी रुग्णालयांची मेडिकल सक्ती संपणार!

ठाणे-पालघरमधील माजी सैनिक व गुणवंत पाल्यांसाठी ‘विशेष गौरव पुरस्कार’; १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.