Lokrakshanay
Wednesday, June 10, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

मेट्रो कामे, झाडांच्या फांद्या आणि उड्डाणपुलांमुळे अडथळे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 10, 2026
in ताज्या बातम्या, पुणे
पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुणेकरांना लंडनप्रमाणे डबल डेकर बसमधून प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेला पीएमपीचा इलेक्ट्रिक डबल डेकर बस प्रकल्प सध्या रखडल्याचे चित्र आहे. या प्रकल्पाला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नसून पूर्वी निश्चित करण्यात आलेले मार्ग तांत्रिक अडचणींमुळे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेट्रोची सुरू असलेली कामे, रस्त्यांवरील झाडांच्या वाढलेल्या फांद्या, वीजवाहिन्या तसेच उड्डाणपुलांची उंची या कारणांमुळे डबल डेकर बसच्या वाहतुकीत अडथळे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) नव्याने मार्गांचे सर्वेक्षण करण्याची वेळ आली आहे. जून २०२५ मध्ये पीएमपीने चार संभाव्य मार्गांवर सर्वेक्षण केले होते. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये हिंजवडी, रामवाडी, कल्याणीनगर, पुणे रेल्वे स्थानक, लोहगाव विमानतळ आणि भोसरी या मार्गांचा विचार करण्यात आला होता. या प्रकल्पाअंतर्गत सुरुवातीला १० ते २५ इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस सुरू करण्याचा प्रस्ताव होता. कात्रज डेपो ते हिंजवडी या मार्गावर यशस्वी चाचणीही घेण्यात आली होती. मात्र, अनेक मार्गांवर सुरू असलेली मेट्रोची कामे आणि डबल डेकर बसची सुमारे साडेचार मीटर उंची यामुळे व्यवहार्यतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी प्रकल्प रद्द झालेला नसल्याचे स्पष्ट करत नव्या मार्गांचा अभ्यास सुरू असल्याची माहिती दिली. नव्या सर्वेक्षणामध्ये बसची उंची आणि मेट्रो पुलांमधील अंतर, रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या, वीजवाहिन्यांचा अडथळा, सब-वे आणि उड्डाणपुलांखालील उपलब्ध जागा यांची सविस्तर तपासणी केली जाणार आहे. याशिवाय बसच्या बॅटरीची कार्यक्षमता, देखभाल खर्च आणि संभाव्य बिघाडांच्या शक्यतांचाही अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान, पुण्यात दररोज सुमारे १२ लाख प्रवासी पीएमपीच्या १,७७० बसेसचा वापर करतात. ही संख्या शहराच्या गरजांच्या तुलनेत अपुरी असल्याचे मानले जाते. जूनअखेर ४५ नवीन बसेस, वर्षअखेरीस आणखी मोठ्या संख्येने बसेस आणि पुढील वर्षापर्यंत सुमारे पावणेतीन हजार बसेस ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांनी महागड्या डबल डेकर प्रकल्पापेक्षा नियमित बसेसची संख्या वाढवून सेवा गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्याची मागणी केली आहे.

Previous Post

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Next Post

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

Next Post
तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

BreakingNews

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

गाव-पाड्यांची तहान भागली! ठाणे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांना टँकरचा आधार

तिसऱ्या महायुद्धाची नांदी? अमेरिकेने इराणची २० ठिकाणं उडवली; तासाभराच्या थराराने जग हादरलं!

पुणेकरांची ‘डबल डेकर’ हवेतच? कोट्यवधींचा खर्च, ठरलेले १० मार्ग कागदावरच!

अंबरनाथ-बदलापूरमध्ये स्कूल बस भाड्यात १० टक्के वाढ; जुलैपासून नवे दर लागू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.