Lokrakshanay
Thursday, May 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

ठाणे-पालघरमधील यांत्रिक नौकांना दोन महिन्यांची बंदी; उल्लंघन केल्यास नौका आणि मासळी जप्त होणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 28, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. समुद्रातील मासळीच्या साठ्याचे संवर्धन आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांच्या सुरक्षेसाठी शासनाने १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पावसाळी मासेमारीवर बंदी जाहीर केली आहे. ठाणे-पालघर जिल्ह्याचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) दिनेश पाटील यांनी यासंदर्भातील माहिती दिली. या दोन महिन्यांच्या कालावधीत समुद्रातील माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे मासेमारी बंदीमुळे माशांच्या बीज निर्मितीला चालना मिळून समुद्रातील मासळीचा साठा वाढण्यास मदत होणार आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार, ही बंदी सर्व प्रकारच्या यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांना लागू राहणार असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचलित नौकांना या नियमातून सवलत देण्यात आली आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सध्या समुद्रात गेलेल्या सर्व यांत्रिक नौकांनी ३१ मेपूर्वी बंदरात परतणे बंधनकारक असेल. १ जूननंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरांवर मासे उतरवण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच, राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपलीकडे खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे. शासनाने सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. बंदीच्या काळात एखादी यांत्रिक नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमांतर्गत संबंधित नौका, मासेमारीसाठी वापरलेली साधने आणि पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच संबंधित मालकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. बंदीच्या काळात समुद्रात जाऊन अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत किंवा नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

Next Post

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

Next Post
ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

BreakingNews

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.