Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 14, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राष्ट्रीय
CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : CBSE दहावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, देशभरातील सुमारे २५ लाख विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकाल जाहीर होताच अधिकृत वेबसाइट्सवर प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याने अनेकदा सर्व्हर डाऊन होणे किंवा वेबसाइट क्रॅश होण्याच्या समस्या निर्माण होतात. एकाच वेळी लाखो विद्यार्थी निकाल पाहण्याचा प्रयत्न करत असल्याने पोर्टल संथ गतीने चालते किंवा काही वेळेस पूर्णपणे बंद पडते. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी अडचणी येऊ नयेत यासाठी पर्यायी माध्यमांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत वेबसाइटवर अवलंबून न राहता इतर डिजिटल पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर DigiLocker हे एक प्रभावी आणि सोयीस्कर माध्यम म्हणून समोर आले आहे. डिजिलॉकरच्या माध्यमातून विद्यार्थी आपली डिजिटल गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे सहजपणे डाउनलोड करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी आधीच डिजिलॉकरवर आपले खाते सक्रिय करून ठेवणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणेकडून याबाबत सूचना जारी करण्यात आली असून, निकालाच्या वेळी कोणताही विलंब टाळण्यासाठी आगाऊ तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे APAAR आयडी नाही, त्यांनी घाबरून जाण्याची गरज नसून ते त्यांच्या शाळेकडून मिळालेल्या ॲक्सेस कोड आणि आवश्यक तपशीलांच्या आधारे cbseservices.digilocker.gov.in या संकेतस्थळावर जाऊन खाते तयार करू शकतात. तर APAAR आयडी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका थेट ‘Issued Documents’ या विभागात उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यार्थी कोणत्याही तांत्रिक अडचणींशिवाय आपला निकाल वेळेवर पाहू शकतील.

डिजीलॉकरवर अकाउंट कसे सक्रिय करावे?

  • digilocker.gov.in वर जा.
  • ‘Get Started’ वर क्लिक करा.
  • शाळेतून मिळालेल्या एक्सेस कोड आणि आपले डिटेल्स भरा.
  • मोबाईल नंबर आलेल्या ओटीपीवरून व्हेरिफाय करा. त्याची पडताळणी करा.
  • अकाउंट एक्टिव्ह होईल आणि रिझल्ट येताच तुम्हाला मार्कशीट मिळेल.
  • दरम्यान निकाल तपासण्यासाठी तुम्हाला या पाच गोष्टींची आवश्यकता असेल, रोल नंबर, स्कूल नंबर(School Number) , प्रवेशपत्र आयडी (Admit Card ID), जन्मतारीख (Date of Birth) , सुरक्षा पिन.

अधिकृत वेबसाइट cbsc.gov.in व्यतिरिक्त तुम्ही results.nic.in, उमंग ॲप आणि SMS/IVRS सुविधेद्वारे देखील तुमचे गुण तपासू शकता. मे महिन्यात होणाऱ्या सत्र २ परीक्षेचा निकाल CBSE लवकरच जाहीर केला जाणार आहे. मागील अनेक वर्षांच्या ट्रेंडनुसार १०वीचा निकाल एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. दरम्यान, सीबीएसई बोर्डाचा १२वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.

Previous Post

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

Next Post

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

Next Post
उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी 'तीन' विशेष SOP जारी

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.