Lokrakshanay
Thursday, May 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

पाळीच्या दिवसातही विद्यार्थिनींना मिळणार हक्काचा आराम; शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसह ‘पिंक रूम’ सज्ज

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 2, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
पाळीच्या दिवसातही विद्यार्थिनींना मिळणार हक्काचा आराम; शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसह ‘पिंक रूम’ सज्ज
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या मासिक पाळीशी संबंधित अडचणींमुळे शिक्षण खंडित होण्याचे गंभीर वास्तव लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींसाठी ‌‘पिंक रूम‌’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या उपक्रमासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पाच शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या खोल्या उभारल्या जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली.

किशोरवयात मुलींमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांची प्रक्रिया सुरू होते. या संवेदनशील काळात स्वच्छता, गोपनीयता आणि आत्मसन्मान जपण्यासाठी सुरक्षित जागेची गरज असते. मात्र ग्रामीण भागात या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने अनेक मुलींना मासिक पाळीदरम्यान शाळा टाळावी लागते, तर काही वेळा त्यांचे शिक्षण कायमचे थांबते. युनिसेफच्या सर्वेक्षणानुसार देशभरात दरवर्षी सुमारे २३ लाख मुली मासिक पाळीशी संबंधित अडचणींमुळे शाळा सोडतात, तर तब्बल ७१ टक्के मुलींना पहिली पाळी येईपर्यंत त्याविषयी कोणतीही माहिती नसते. सामाजिक गैरसमज, स्वच्छतेबाबत अज्ञान, सुविधा अभाव आणि आर्थिक मर्यादा या समस्यांना अधिक तीव्र करतात. या पार्श्वभूमीवर ‌‘पिंक रूम‌’ हा उपक्रम केवळ सुविधा नसून शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हस्तक्षेप मानला जात आहे. मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन बदलणे, विश्रांती घेणे आणि स्वतःची स्वच्छता राखणे यासाठी मुलींना शाळेतच सुरक्षित व स्वतंत्र जागा उपलब्ध होणार आहे. साधारणपणे १५ बाय २० फूट आकाराची वर्गखोली ‌‘पिंक रूम‌’ म्हणून विकसित केली जाणार असून, प्रत्येक शाळेसाठी सुमारे ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.या उपक्रमामुळे मुलींची शाळेतील उपस्थिती वाढण्यास आणि शिक्षणात सातत्य राखण्यास मदत होणार आहे.

Previous Post

ना पाकिस्तान, ना लियारी! धुरंधरचं शूट पाकिस्तानात नाही तर चक्क बँकॉकला?

Next Post

रुग्णांच्या दारी पोहचले आरोग्यदूत! ठाणे जिल्ह्यात घरपोच उपशामक उपचार मोहिमेला यश

Next Post
रुग्णांच्या दारी पोहचले आरोग्यदूत! ठाणे जिल्ह्यात घरपोच उपशामक उपचार मोहिमेला यश

रुग्णांच्या दारी पोहचले आरोग्यदूत! ठाणे जिल्ह्यात घरपोच उपशामक उपचार मोहिमेला यश

BreakingNews

बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी ‘साथी’ पोर्टल सुरू; शेतकऱ्यांसाठी पारदर्शकतेकडे डिजिटल पाऊल

‘नटसम्राट’ नाटक केलं असतं तर कदाचित मेलो असतो – नाना पाटेकर

HSRP नंबर प्लेट नसल्यास १ जुलैपासून दंडात्मक कारवाई!

धोकादायक व रेबीजग्रस्त भटक्या कुत्र्यांवर कठोर कारवाईला मान्यता; सार्वजनिक ठिकाणांहून हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायम

देशात चिकनपॉक्स रुग्णसंख्येत वाढ; डॉक्टरांकडून सतर्कतेचा इशारा

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाविरोधात ठाण्यात बैलगाडी मोर्चा; जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.