Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

हायटेक महाराष्ट्र पोलीस! गुन्हेगारांचा शोध घेणार मायक्रोसॉफ्टचे खास AI ॲप

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 10, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
हायटेक महाराष्ट्र पोलीस! गुन्हेगारांचा शोध घेणार मायक्रोसॉफ्टचे खास AI ॲप
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी आता महाराष्ट्र पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळणार आहे. प्रसिद्ध आयटी कंपनी Microsoft ने विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महा क्राईम OS AI’ या प्लॅटफॉर्मचा प्रयोग सध्या नागपूर ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत असून त्याला मोठे यश मिळाले आहे. या तंत्रज्ञानामुळे तपासी अधिकाऱ्यांना गुन्ह्याचा तपास करताना टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन मिळणार असून तपासातील चुका कमी होण्यास मदत होणार आहे. नागपूर ग्रामीण पोलीस दलात या प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक वापर सुरू असून आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त गुन्ह्यांच्या तपासात या प्रणालीने पोलिसांना मदत केल्याची माहिती समोर आली आहे. या तंत्रज्ञानामुळे गुन्हा नोंदवल्यानंतर तपासाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होणार असल्याचे व पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

‘महा क्राईम OS AI’ हे प्लॅटफॉर्म पोलिसांकडून नोंदवलेली एफआयआर प्रणालीमध्ये घेतल्यानंतर त्या गुन्ह्याच्या तपासासाठी सविस्तर आराखडा तयार करून देते. तपासी अधिकाऱ्यांनी पुढे कोणती पावले उचलावी, कोणत्या पुराव्यांची तपासणी करावी आणि कोणती प्रक्रिया करावी याबाबत कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शन करते. त्यामुळे तपास अधिक व्यवस्थित आणि पुराव्यांवर आधारित होण्यास मदत होते. याशिवाय संशयितांच्या फोन नंबरचे सीडीआर (Call Detail Record) मिळवणे, त्याचे अचूक विश्लेषण करणे तसेच तपासादरम्यान लागणारी अधिकृत पत्रे तयार करणे यासारखी अनेक कामेही हा प्लॅटफॉर्म अत्यंत कमी वेळेत पूर्ण करतो. या प्रणालीद्वारे सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचाही वापर करता येतो. त्यामुळे गुन्ह्यातील संशयित व्यक्तींचा शोध घेणे अधिक सोपे होणार आहे. सध्या नागपूर ग्रामीण पोलिसांच्या १३३ अधिकाऱ्यांना या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले असून गेल्या काही आठवड्यांपासून त्याचा वापर सुरू आहे. डिसेंबर २०२५ मध्ये सत्य नडेला यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या गृह विभागासोबत सामंजस्य करार करण्यात आला. नागपूर ग्रामीणमधील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये ‘महा क्राईम OS AI’ लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक Harsh Poddar यांनीही या तंत्रज्ञानामुळे गुन्हे तपास अधिक परिणामकारक होणार असल्याचे सांगितले. या आधुनिक प्रणालीमुळे महाराष्ट्र पोलिसांच्या तपास प्रक्रियेला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

माता-बालमृत्यू दर रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची साथ! आशा सेविकांच्या मदतीसाठी ‘आशा स्पर्श’ ॲप विकसित

Next Post

विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस! विजेतेपदासह पटकावले तब्बल २७.५ कोटी रुपये

Next Post
विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस! विजेतेपदासह पटकावले तब्बल २७.५ कोटी रुपये

विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस! विजेतेपदासह पटकावले तब्बल २७.५ कोटी रुपये

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.