मुंबई : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ज्या महिलांची ईकेवायसी करताना चुकी झाली आहे त्यांना ती दुरुस्ती करता येणार आहे. अनेक महिलांना केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला आहे. प्रश्न नीट समजला नसल्याने त्यांनी चुकीचा पर्याय निवडला आहे. या महिला पुन्हा केवायसी करु शकतात. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ आहे. त्यानंतर तुम्ही केवायसीमध्ये दुरुस्ती करु शकत नाही. यामुळे ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया महिला व बालविकास विभागाच्या लाडकी बहीण या पोर्टलवर सुरु आहे.
ईकेवायसी दुरुस्तीसाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस :
- सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जावे.
- यानंतर ईकेवायसीची संधी त्या लाभार्थ्यांचे ज्यांनी चुकीचेपर्याय निवडले आहेत, असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लित करा.
- यानंतर आधार नंबर टाकावा. कॅप्चा कोड सबमिट करा.
- यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो टाकावा.
- यानंतर अर्जात ज्या ठिकाणी चूक झाली आहे. त्यामध्ये माहिती भरा.
- कुटुंबातील अटी आणि शर्ती वाचून चेकबॉक्सवर क्लिक करा.
- यानंतर फायनल सबमिट बटनवर क्लिक करा. यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाली असा मेसेज तुम्हाला येईल.

