Lokrakshanay
Tuesday, June 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या! गुन्हे शाखेच्या युनिट ३ कडून ३ पिस्तुलं आणि जिवंत काडतुसांचा साठा जप्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 19, 2026
in गुन्हेगारी, पुणे
सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या! गुन्हे शाखेच्या युनिट ३ कडून ३ पिस्तुलं आणि जिवंत काडतुसांचा साठा जप्त
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सागर दत्तात्रय सोनलकर (वय २५, रा. सिद्धीविनायक सोसायटी, अभिनव कॉलेजजवळ, नर्‍हे, मुळ रा. डिएस के पायथा, धायरी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने पिस्टल बाळगले असल्याचे तो पोलिसांना सांगत आहे.

सागर सोनलकर याच्यावर शिरुर पोलीस ठाणे आणि हवेली पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. पूर्वी तो धायरीमध्ये रहायला होता. सध्या तो नर्‍हे येथे रहायला आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक शिवजयंती उत्सवाच्या अनुषंगाने अवैध धंदे, रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार गुन्हेगार चेक करुन कारवाई करण्याचे काम करत होते. सिंहगड रोड परिसरात ते पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली.  या बातमीवरुन पोलिसांनी सागर सोनलकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे मिळाली. त्याला अटक करुन अधिक तपास करण्यासाठी त्याच्या घराची झडती घेण्यात आली. घरात आणखी २ गावठी पिस्टल आढळून आली. पोलिसांनी त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल आणि १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहे. त्याला अधिक तपासासाठी नर्‍हे पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. त्याने ही पिस्टल कोणाकडून आणली. कशासाठी तो एकावेळी ३ पिस्टल बाळगुन होता, याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे करीत आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, नितीन जगदाळे, कैलास लिम्हण, किशोर शिंदे, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुनला, योगेश झेंडे यांनी केली आहे.

Previous Post

लाडक्या बहिनींनो अंतिम संधी सोडू नका! पाहा केवायसी दुरुस्त करण्याची संपूर्ण प्रोसेस

Next Post

शिवकालीन इतिहासाचा जागर आणि ‘शिव शंभू गाथा’च्या गजराने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय दुमदुमले

Next Post
शिवकालीन इतिहासाचा जागर आणि ‘शिव शंभू गाथा’च्या गजराने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय दुमदुमले

शिवकालीन इतिहासाचा जागर आणि 'शिव शंभू गाथा'च्या गजराने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय दुमदुमले

BreakingNews

शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर मनसे आक्रमक; स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेवरून आंदोलनाचा इशारा

व्यावसायिक गॅस सिलिंडर पुन्हा महागला; वर्षातील सलग सातवी दरवाढ!

मध्य रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमणांचा विळखा; १६ हजारांहून अधिक झोपड्यांनी व्यापली जागा!

लाडकी बहीण ई-केवायसीनंतर योजनेत ८१ लाख लाभार्थी अपात्र! सरकारचा दरमहा १२०० कोटींचा खर्च वाचणार

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.