Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

कोकणातील चाकरमान्यांसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त विशेष रेल्वेसेवा!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 10, 2026
in कोकण, ताज्या बातम्या, मुंबई
कोकणातील चाकरमान्यांसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त विशेष रेल्वेसेवा!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : ‘व्हॅलेंटाईन डे’, महाशिवरात्र आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सीएसएमटी – सावंतवाडीदरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. या विशेष रेल्वेगाडीने प्रवाशांना मुंबईतून थेट सावंतवाडी गाठणे शक्य होईल. ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त प्रियकर-प्रेयसी, मित्र परिवार आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी मिळते. हा दिवस साजरा करण्यासाठी आणि महाशिवरात्रदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या समन्वयाने गाडी क्रमांक ०११२९ / ०११३० सीएसएमटी – सावंतवाडी रोड – सीएसएमटी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०११२९ सीएसएमटी – सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून १४, १९ आणि २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२.२० वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३० सावंतवाडी रोड – सीएसएमटी विशेष रेल्वेगाडी १४, १९ आणि २१ फेब्रुवारी सायंकाळी ५.२० वाजता रोजी सावंतवाडी रोडवरून सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही रेल्वेगाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ डबे असतील. यात द्वितीय वातानुकूलित श्रेणीचा एक डबा, तृतीय वातानुकूलित श्रेणीचे ५ डबे, शयनयान १० डबे, सामान्य ४ डबे एसएलआरचे २ डबे असतील. या रेल्वेगाडीचे आरक्षण प्रवासी आरक्षण प्रणाली, आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. कोकणातील अनेक प्राचीन शिव मंदिरांत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळते. कोकण रेल्वे मार्गाचा विचार केल्यास हरिहरेश्वर (श्रीवर्धन), विरेश्वर (महाड), देवाचा डोंगर (खेड), वेळणेश्वर (गुहागर), मार्लेश्वर (देवरुख – संगमेश्वर), कर्णेश्वर (संगमेश्वर), कुणकेश्वर (देवगड) या आणि अशा अनेक प्राचीन शिव मंदिरात शिवभक्तांची गर्दी होते. त्यामुळे मुंबईत स्थायिक झालेले अनेक नागरिक यानिमित्त आपल्या मूळ गावी जातात. नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी प्रचंड मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांना नियमित रेल्वेगाडीतून प्रवास करणे अवघड होते. भाविकांना कोकणातील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळांना भेटी देता येत नाही. सीएसएमटी – सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडीमुळे भाविकांना दिलासा मिळेल.

Previous Post

ट्रॅव्हल्स, बस नाही चक्क पोलीस व्हॅनमधून निघालं लग्नाचे वऱ्हाड!

Next Post

२०२६ अखेरपर्यंत भारतातील सर्व विमानतळांवर सुरू होणार उडान यात्रा कॅफे; सर्वसामान्य प्रवाशांना स्वस्त दरात मिळणार चहा- समोसा

Next Post
२०२६ अखेरपर्यंत भारतातील सर्व विमानतळांवर सुरू होणार उडान यात्रा कॅफे; सर्वसामान्य प्रवाशांना स्वस्त दरात मिळणार चहा- समोसा

२०२६ अखेरपर्यंत भारतातील सर्व विमानतळांवर सुरू होणार उडान यात्रा कॅफे; सर्वसामान्य प्रवाशांना स्वस्त दरात मिळणार चहा- समोसा

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.