Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

२०२६ अखेरपर्यंत भारतातील सर्व विमानतळांवर सुरू होणार उडान यात्रा कॅफे; सर्वसामान्य प्रवाशांना स्वस्त दरात मिळणार चहा- समोसा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 10, 2026
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
२०२६ अखेरपर्यंत भारतातील सर्व विमानतळांवर सुरू होणार उडान यात्रा कॅफे; सर्वसामान्य प्रवाशांना स्वस्त दरात मिळणार चहा- समोसा
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : विमान प्रवास… अनेकांसाठी हा मुद्दा प्रचंड कुतूहलाचा असला तरीही या विमानतळावर पोहोचल्यानंतर आजही सर्वसामान्य प्रवासी मात्र काही गोष्टी प्रकर्षानं टाळतात. इथं त्यांचा नवखेपणा कारणीभूत नसून कारण असते ते म्हणजे आर्थिक नियोजनाचं. विमानतळावर पोहोचलं असता तिथं भूक लागली की, काही मंडळी ती भूकही आवरतात. कारण, बाहेर २० रुपयांना मिळणाऱ्या एखाद्या पदार्थासाठी विमानतळावर थेट २०० ते २५० रुपये मोजावे लागतात. इतर पदार्थांचे दरही त्याच पटीनं वाढतात. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारकडून आता देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांना परवडणाऱ्या, त्याहूनही स्वस्त दरात चहा आणि समोसा यासह इतरही खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचा बेत आखला जात आहे.

केंद्रानं आखलेल्या या बेतानुसार २०२६ या वर्षअखेरीपर्यंत भारतातील जवळपास सर्व विमानतळांवर ‘उडान यात्रा कॅफे’ सुरू करण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर देशातील काही विमानतळांवर ही सुविधा सुरू करण्यात आली असून यामध्ये कोलकाता, पुणे, अहमदाबाद, विजयवाडा, भुवनेश्वर आणि चेन्नईचा यामध्ये समावेश आहे.  देशातील अनेक अशी विमानतळं आहेत जिथं मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर सामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. किंबहुना काही ठिकाणी तर एक कप चहासाठी २०० ते ३०० रुपयेसुद्धा मोजावे लागतात. या वस्तुस्थितीविरोधात सातत्यानं सूर आळवला जात असल्याचं पाहून केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं ‘उडान यात्रा कॅफे’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  ‘उडान यात्रा कॅफे’ या योजनेअंतर्गत मागील वर्षी कोलकाता विमानतळावर शुभारंभ करण्यात आला जिथं विमानतळावरच प्रवाशांना १० रुपयांना चहा, २० रुपयांमध्ये कॉफीस १० रुपयांमध्ये पाण्याची बाटली, २० रुपयांमध्ये समोसा आणि २० रुपयांमध्ये रसगुल्ला उपलब्ध करून देण्यात आला.

Previous Post

कोकणातील चाकरमान्यांसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त विशेष रेल्वेसेवा!

Next Post

गुंतवणुकीच्या फसवणूकीप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदेसोबत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
गुंतवणुकीच्या फसवणूकीप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदेसोबत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गुंतवणुकीच्या फसवणूकीप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदेसोबत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.