Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home आरोग्य

जागतिक कर्करोग दिन : जागरूकता, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार हेच कर्करोगावरचे प्रभावी शस्त्र

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 4, 2026
in आरोग्य, ठाणे, ताज्या बातम्या
जागतिक कर्करोग दिन : जागरूकता, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार हेच कर्करोगावरचे प्रभावी शस्त्र
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणे, प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे तसेच वेळेवर निदान व उपचारांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा या दिनामागील मुख्य उद्देश आहे. सध्याच्या घडीला कर्करोग हा गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनत असून, योग्य माहिती, आरोग्यदायी जीवनशैली आणि नियमित वैद्यकीय तपासणी यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कर्करोग टाळता येऊ शकतात किंवा सुरुवातीच्या टप्प्यात ओळखून यशस्वीपणे उपचार करता येतात. त्यामुळे कर्करोगाविषयी भीती न बाळगता जागरूकता आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.

कर्करोग होण्यामागील प्रमुख कारणे :

  • तंबाखू व मद्यसेवन
  • अस्वास्थ्यकर आहार व शारीरिक निष्क्रियता
  • वाढता ताणतणाव
  • पर्यावरणीय प्रदूषण
  • काही आनुवंशिक कारणे

कर्करोग प्रतिबंधासाठी महत्त्वाचे उपाय :

  • तंबाखू व इतर व्यसनांपासून दूर राहणे
  • संतुलित आहार व नियमित व्यायाम
  • महिलांनी स्तन व गर्भाशय मुख कर्करोगाची नियमित तपासणी करणे
  • पुरुषांनी तोंड व फुफ्फुस कर्करोग तपासणी करणे
  • कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे

लक्षणे दुर्लक्षित करू नयेत :

  • वजन अचानक कमी होणे
  • वारंवार ताप येणे
  • तोंडामध्ये दीर्घकाळ न बऱ्या होणाऱ्या फोडी
  • सततचा खोकला किंवा आवाज बसणे
  • अंगावर गाठी येणे
  • असामान्य रक्तस्राव

ठाणे ग्रामीण भागात २०२५–२०२६ या कालावधीत मुख कर्करोगाचे २२, स्तन कर्करोगाचे १७ तर गर्भाशय कर्करोगाचे ३ रुग्ण निदानास आले असल्याची नोंद आहे. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी आरोग्य तपासणीबाबत सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक कर्करोग दिनानिमित्त सर्व नागरिकांनी तणावमुक्त, व्यसनमुक्त व आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे, दैनंदिन व्यायाम करणे, संतुलित आहार घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.“कर्करोगाला घाबरू नका, योग्य माहिती आणि चांगल्या जीवनशैलीने त्याचा सामना करा” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. कर्करोगाविषयीची भीती दूर करून सकारात्मक दृष्टिकोन, वेळेवर निदान आणि योग्य उपचार यांद्वारे निरोगी जीवन शक्य आहे.

Previous Post

भारतात व्हॉट्सॲप बंद होणार? डेडलाईन जाहीर

Next Post

अजित पवारांचे पुढचे कोणतेही विधी होणार नाहीत! पवार कुटुंबीयांनी ३ दिवसांतच उरकले दशक्रिया विधी

Next Post
अजित पवारांचे पुढचे कोणतेही विधी होणार नाहीत! पवार कुटुंबीयांनी ३ दिवसांतच उरकले दशक्रिया विधी

अजित पवारांचे पुढचे कोणतेही विधी होणार नाहीत! पवार कुटुंबीयांनी ३ दिवसांतच उरकले दशक्रिया विधी

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.