Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

मुंब्र्यातील अपहरण झालेल्या ३ महिन्यांच्या बाळाची सहा दिवसात सुटका

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 31, 2026
in गुन्हेगारी, ठाणे, ताज्या बातम्या
मुंब्र्यातील अपहरण झालेल्या ३ महिन्यांच्या बाळाची सहा दिवसात सुटका
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुंब्रा येथे तीन महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या दोघांविरोधात कठोर कारवाई करत मुंब्रा पोलिसांनी अवघ्या सहा दिवसांत आरोपींना अटक करून अपहृत बाळाला सुखरूप ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. अथक तपास, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने हा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे. यामध्ये मुंब्रा पोलिसांनी मोहम्मद गुलाब आणि खैरुणीसा मोहम्मद यांना अकोला येथून अटक केली आहे.

मुंब्रा येथे २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास डीसीबी बँकेसमोरील खाडीमशीन रोडवर फरजाना मोहम्मद फिरोज मन्सुरी या त्यांच्या दोन मुलींसह रस्ता ओलांडत असताना एक अनोळखी बुरखाधारी महिलेने तीन महिन्यांची मुलगी आफिया हिला “मी समोरच जाते” असे सांगून मांडीवर घेतले व संधी साधून पळ काढला. याप्रकरणी बालिकेच्या आई वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार केली. याबाबत लगेचच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला. गुन्हा दाखल होताच चार स्वतंत्र तपास पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता अपहरण करणारी महिला रिक्षाने मुंब्रा स्टेशनपर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात ती महिला एका पुरुषासह मुंबईच्या दिशेने लोकलने प्रवास करत असल्याचे आढळून आले. ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला आदी स्थानकांवरील सीसीटीव्ही तपासून संशयितांची हालचाल टिपण्यात आली. तपासाची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी बाळाचे कपडे व स्वतःचा पेहराव बदलल्याचेही उघड झाले. दरम्यान, आरोपींसोबत असलेल्या आणखी एका महिलेचा माग काढत पोलीस पथक इन्शानगर, शादी महल परिसरात पोहोचले. तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची साथीदार नसरीन इकलाख शेख हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्या चौकशीत अपहृत बाळ अकोला जिल्ह्यातील खेटरी (ता. पातूर) येथे असल्याचे निष्पन्न झाले.

Previous Post

मुंबईतील शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात; येत्या पावसाळ्यात वाहतुकीसाठी प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल

Next Post

मुंबईत पार पडली ‘तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धा’! ५०० हून खेळाडूंचा सहभाग

Next Post
मुंबईत पार पडली ‘तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धा’! ५०० हून खेळाडूंचा सहभाग

मुंबईत पार पडली ‘तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धा’! ५०० हून खेळाडूंचा सहभाग

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.