Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home नाशिक

“बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही घेतलं?” – वन अधिकारी जाधव यांचा गिरीश महाजनांच्या भाषणावर आक्षेप

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 27, 2026
in नाशिक
“बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही घेतलं?” – वन अधिकारी जाधव यांचा गिरीश महाजनांच्या भाषणावर आक्षेप
Share on FacebookShare on Whatsapp

नाशिक : प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह दिसून येत असतानाच नाशिकमध्ये वेगळीच घटना घडली. नाशिकच्या पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असताना मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदन केले, उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मंत्री महाजन यांनी आपल्या भाषणात संविधानाशी संबंध नसलेल्यांचं नाव घेतल्याचा आक्षेप वन अधिकारी माधवी जाधव यांनी घेतला. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही, असा सवाल उपस्थित केला. वन विभागाच्या अधिकारी माधवी जाधव यांनी कार्यक्रमास्थळी घातलेल्या गोंधळानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. माधवी जाधव यांच्या सहकाऱ्यांनी समजूत काढत कार्यक्रमाच्या ठिकाणाहून त्यांना बाजूला नेलं. “मंत्री महोदयांनी बाबासाहेबांचे नाव घेतलं नाही. संविधान घडविलं त्यांनाच संपवायला निघालेत”, असा आरोप या महिला अधिकाऱ्यानं केल्यानं काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

वन अधिकारी माधवी जाधव म्हणाल्या, “जो संविधानाला कारणीभूत आहे, त्यालाच तुम्ही संपवायला निघाला आहात. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे. मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांची त्यांची चूक पदरात घ्यावी”. संतापलेल्या अधिकाऱ्यांना महिला पोलिसांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी म्हटलं, “मला मीडियाशी देणे-घेणे नाही. वाळू गाड्या उचलीन. मातीकाम करेन. पण, बाळासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मला सस्पेंड करायचे असेल तर करू शकता. बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. मी २६ जानेवारी मानत नाही. पण, लोकशाही आहे. मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्रीसुद्धा संविधानामुळे आहेत. कोणता जातीभेद केलेला नाही. समानता केलेली आहे. लोकशाहीला कारणीभूत नसलेल्यांची नावे घेतलेली आहेत. पण, प्रजासत्ताकदिनाचा मानकरी आहे, त्यांच नाव घेण्यात आलं नाही”.वन अधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब यांचं नाव घेणं अनवधानानं राहिलं असेल, असे म्हटलं आहे. ” माझा तसा कुठलाही हेतू नव्हता. त्यात मी फक्त भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, अशा घोषण्या दिल्या. माझं नाव डावलण्याचा कुठलाही हेतू नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांचं नाव न घेणं ही पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे . त्यांनी चूक मान्य करावी. मला सस्पेंड केलं तरी चालेल. वाळूच्या गाड्या उचलेल. माती काम करेल. पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. बाबासाहेबांना संपायचं काम करायचं नाही-वन अधिकारी, माधवी जाधव

Previous Post

१८ वर्षांखालील मुलांच्या AI वापरावर मेटाची बंदी

Next Post

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश; तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Next Post
नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश; तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश; तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

BreakingNews

पारशी डेअरीवर FDA ची मोठी पकड! दूध भेसळप्रकरणी परवाना निलंबित, दोघांना बेड्या

१८ महिन्यांचा रेकॉर्ड दाखवा! पोलीस ठाण्यांतील CCTV फुटेजबाबत उच्च न्यायालयाचे कडक पाऊल

मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात! १५ ऑगस्टपासून चिपी विमानतळावरून नवी उड्डाणे

रस्त्यावर थुंकल्यास आता मोजावे लागणार तब्बल २००० रुपये; हायकोर्टाची BMCला सक्त ताकीद

ट्रॅफिकमधून सुटका! वर्षाअखेरीस ठाणे-भिवंडी मेट्रो ५ चा पहिला टप्पा सुरू होणार

भेसळखोरांवर FDAचा डिजिटल बडगा; एआय-आधारित ऑनलाइन तक्रार प्रणाली सुरू!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.