Lokrakshanay
Saturday, April 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाची भेट! खात्यात पैसे खटाखट जमा झाले

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 1, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
लाडक्या बहिणींना नवीन वर्षाची भेट! खात्यात पैसे खटाखट जमा झाले
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यभरातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी संमिश्र बातमी समोर आली आहे. बुधवारी, ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी सरकारने पात्र महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेक बहिणींचे मोबाईल मेसेजने खणखणले असले, तरी दुसरीकडे ई-केवायसीच्या नियमाने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अपेक्षा ४५०० ची, पण मिळाले १५०० रुपये डिसेंबर महिना उलटून गेल्यानंतर महिलांना अशी अपेक्षा होती की, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे मिळून एकूण ४,५०० रुपये किंवा किमान दोन महिन्यांचे ३,००० रुपये एकत्र मिळतील. मात्र, सध्या सरकारने केवळ नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा केला आहे. सणासुदीच्या आणि नवीन वर्षाच्या काळात केवळ एकाच हप्त्यावर समाधान मानावं लागल्याने काही महिलांमध्ये नाराजी दिसत असली, तरी हप्ता जमा झाल्याने मोठा दिलासाही मिळाला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी २०२६ सालाची सुरुवात चिंतेची ठरू शकते. सरकारने या योजनेसाठी अनिवार्य केलेली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपली आहे. ज्या महिलांनी ही मुदत पाळली नाही, त्यांच्या बँक खात्यात १ जानेवारी २०२६ पासून १५०० रुपयांचा हप्ता येणे कायमचे बंद होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ पात्र महिलांपर्यंतच लाभ पोहोचावा, यासाठी सरकारने ई-केवायसी आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे बंधनकारक केले होते. वारंवार आवाहन करूनही ज्या महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना आता नियमानुसार ‘अपात्र’ ठरवले जाऊ शकते. यामुळे अशा महिलांना नवीन वर्षात सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख असल्याने, आता १ जानेवारीपासून या महिलांच्या खात्यात पुढील हप्ते जमा होणार नाहीत. अशा महिलांना आता पुन्हा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारकडून मुदतवाढीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आता २४ तास खुले! नागरिकांना मध्यरात्रीही मिळणार न्याय

Next Post

IKKIS : धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

Next Post
IKKIS : धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

IKKIS : धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

BreakingNews

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.