Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्गांवर ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 27, 2025
in ताज्या बातम्या, देश -विदेश
वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्गांवर ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी जंगलालगतच्या राष्ट्रीय महामार्गांवर ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’चा देशातील पहिला प्रयोग मध्यप्रदेशात करण्यात आला. या तंत्रज्ञानाचा उद्देश केवळ चालकांचा वेग कमी करणे नाही तर वन क्षेत्रात राहणाऱ्या वन्यजीवांची सुरक्षितता सुनिश्चित करणे देखील आहे. मध्यप्रदेशातील घनदाट जंगलातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४५ सध्या चर्चेत आहे. हा महामार्ग तयार करताना दुबईवर आधारित एका अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. रस्त्यावर पाच मिलिमीटर जाडीचे ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’ लावण्यात आले. या तंत्रज्ञानाचा उद्देश केवळ वाहनांचा वेग कमी करणे नाही तर वनक्षेत्रातील वन्यजीवांची सुरक्षितता करणे सुद्धा आहे. नौरादेही व्याघ्रप्रकल्पातून जाणाऱ्या या मार्गाचा सुमारे ११.९६ राष्ट्रीय महामार्ग किलोमीटरचा भाग दोन आणि चार लेनमध्ये विकसित करण्यात आला.

सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या घाटाच्या संवेदनशील वन्यजीव क्षेत्रात हे ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’ लावण्यात आले आहेत. वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे या परिसरात वाघ, बिबट्यांसह हरीण, नीलगाय आणि इतर वन्यप्राण्यांचे रस्ते अपघात सामान्य होते. त्यामुळे या भागाला धोकादायक क्षेत्र मानले जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’ नाही तर पाच मिलिमीटर जाडीच्या पांढऱ्या पेव्हर शोल्डर लाईन्स’ देखील तयार करण्यात आल्या आहेत. वाहनचालकाला डुलकी लागली तर कंपनामुळे त्यांना जाग येते. लाल रंग आधीच धोक्याचा सिग्नल मानला जातो. त्यामुळेही हे तंत्रज्ञान चालकांच्या मानसिकतेवर परिणाम करते. याव्यतिरिक्त प्राण्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी २५ वन्यजीव भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या समस्येवर कायमस्वरूपी उपाय देण्यासाठी या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला.

Previous Post

अगरबत्ती निर्मितीत घातक रसायनांच्या वापरावर बंदी! – केंद्र सरकारचे मोठे पाऊल

Next Post

ठाणे शहरात ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी

Next Post
ठाणे शहरात ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी

ठाणे शहरात ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.