Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘आपकी बेटी योजना’! विद्यार्थिनींच्या खात्यात येणार २५०० रुपये!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 27, 2025
in ताज्या बातम्या, देश -विदेश
लाडकी बहीण योजनेनंतर आता ‘आपकी बेटी योजना’! विद्यार्थिनींच्या खात्यात येणार २५०० रुपये!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना अतिशय प्रसिद्ध आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. सरकार विविध घटकांसाठी अशा योजना जाहीर करत असते. दरम्यान राजस्थान सरकारनेदेखील विद्यार्थीनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी खास योजना आणली आहे. याअंतर्गत विद्यार्थीनींच्या खात्यात दरमहा विशिष्ट रक्कम जमा होणार आहे. राजस्थान सरकारने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी “आपकी बेटी योजना”सुरु केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना, विशेषतः ज्या कुटुंबात पालकांचे निधन झाले आहे किंवा बीपीएल (गरीबी रेषेखालील) श्रेणीतील असलेल्या मुलींसाठी ही योजना आहे. गरिबीमुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडणाऱ्या मुलींच्या ड्रॉपआऊट दर कमी करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

राजस्थान बालिका शिक्षा फाउंडेशनद्वारे ही योजना राबवली जाते. ज्यामध्ये सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलींना थेट आर्थिक सहायता मिळते. यामुळे कुटुंबावरील आर्थिक भार कमी होईल आणि मुली स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.  या योजनेचा लाभ फक्त राजस्थानच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींनाच मिळेल. यासाठी विद्यार्थीनी राजस्थानची कायमस्वरूपी रहिवासी असावी, बीपीएल कुटुंबातील असावी आणि पालकांपैकी एक किंवा दोघांचेही निधन झाले असावे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलींना हा लाभ मिळू शकतो. पुरुष विद्यार्थी किंवा खासगी शाळेतील मुलींना या योजनेचा फायदा घेता येणार नाही.अर्जदाराने जन आधार कार्ड आणि बँक खाते जोडलेले असावे. याशिवाय आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि पालकांच्या मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास) आवश्यक आहेत. हे निकष पूर्ण न केल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो, याची विद्यार्थीनींनी नोंद घ्या.  योजनेअंतर्गत आर्थिक सहायता इयत्तेनुसार दिली जाते. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलींना दरवर्षी ₹२१०० ची मदत मिळेल, जी पुस्तके, शुल्क आणि इतर शिक्षण खर्चासाठी वापरता येईल. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या मुलींना ₹२५०० ची रक्कम मिळेल, जी उच्च शिक्षणासाठी अधिक उपयुक्त ठरेल. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या जन आधार लिंक्ड बँक खात्यात डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे जमा केली जाते. यामुळे पारदर्शकता वाढते. रक्कम वर्षाला एकदा जमा केली जाते आणि ती मुलीच्या नावाने असते. ती रक्कम तिच्याच शिक्षणावरच खर्च व्हावी अशी अपेक्षा असते.

Previous Post

आमिर खान ला पहिल्या आरके लक्ष्मण पुरस्काराने सन्मानित!

Next Post

आधारकार्डच्या माध्यमातून दिली जाणारी जन्म प्रमाणपत्रे रद्द करा, राज्य सरकारचा आदेश

Next Post
आधारकार्डच्या माध्यमातून दिली जाणारी जन्म प्रमाणपत्रे रद्द करा, राज्य सरकारचा आदेश

आधारकार्डच्या माध्यमातून दिली जाणारी जन्म प्रमाणपत्रे रद्द करा, राज्य सरकारचा आदेश

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.