वृत्तसंस्था : बॉलीवूडमध्ये लहान मुलांवर आधारित अनेक चित्रपट आहेत. चिल्ड्रन डे निमित्त तुम्हाला घरी राहून मुलांबरोबर छान वेळ घालवायचा असेल तर एकत्र बसून चित्रपट पाहणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामुळेच बालदिनानिमित्त आम्ही तुम्हाला लहान मुलांवर आधारित चित्रपटांची नावं सांगणार आहोत.
उद्या १४ नोव्हेंबर रोजी चिल्ड्रन डेनिमित्त तुम्ही कोणते चित्रपट घरबसल्या तुमच्या मुलांबरोबर पाहू शकता आणि त्यात कोणते कलाकार आहेत हे जाणून घेऊयात. यामध्ये आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ ते ‘दंगल’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. नील माधब पंडा यांच्या ‘आएम कलाम’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला. दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे. ही गोष्ट एका अशा मुलाची आहे, ज्याला काही करून इंग्रजी शिकायची असते, त्याला शाळेत जायचं असतं, मोठं होऊन कुटुंबाचा आधार व्हायचं असतं. यामधून मुलांना खूप काही शिकायला मिळतं. हा चित्रपट तुम्ही ‘ॲमझॉन प्राइम’वर पाहू शकता.

