Lokrakshanay
Friday, June 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, अंधेरी पश्चिम-पूर्व पादचारी पूल अखेर फेरीवाला-मुक्त!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 10, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, अंधेरी पश्चिम-पूर्व पादचारी पूल अखेर फेरीवाला-मुक्त!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : अंधेरीतील पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाचा पादचारी पूल आता पूर्णपणे फेरीवाला-मुक्त झाला आहे. पुलाची निर्मिती झाल्यापासून येथे फेरीवाल्यांनी बेकायदेशीर पथारी मांडली होती. त्यामुळे पादचारी मार्ग अरुंद होत होता, गर्दी वाढत होती आणि अनेकदा नागरिकांशी वादावादी होत होती. काही महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. महिलांच्या तक्रारींची दखल घेत अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांनी आपल्या पथकासह येथे विशेष कारवाई करून सर्व फेरीवाल्यांना हटवले. या कारवाईनंतर पूल आता मोकळा झाला असून नागरिक निर्धास्तपणे, विनाअडथळा ये-जा करत आहेत. नागरिकांकडून या कारवाईचे जोरदार स्वागत होत असून, पादचारी प्रवासाला दिलासा मिळाला आहे.

पश्चिम रेल्वेवरील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मुख्य पादचारी पूल प्रशासनाकडून अखेर अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्त करण्यात आला आहे. हा पादचारी पूल झाल्यापासूनच फेरीवाल्यांकडून पुलावर होणारी गर्दी, मुलींचा विनयभंग, छेडछाड आणि हाणामारीच्या वाढत्या प्रकारांसंबंधात सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत अंधेरी पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश माचिंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुलावरील सर्व अनधिकृत फेरीवाले हटवले. या कारवाईमुळे हा मुंबईतील पहिला रेल्वे पादचारी पूल आहे. ज्या पूलाने आता मोकळा श्वास घेतला आहे. फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर जागा व्यापल्याने सर्वसामान्यांना चालण्यासाठी मोठी अडचण ठरत होती. आता पूल मोकळा झाल्याने आणि पोलिसांनी गस्त वाढवल्याने पादचारी आणि विशेषतः महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Previous Post

क्रिकेटविश्वात विक्रम! एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम

Next Post

आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच साकारणार डिटेक्टिव्हची मुख्य भूमिका!

Next Post
आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच साकारणार डिटेक्टिव्हची मुख्य भूमिका!

आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच साकारणार डिटेक्टिव्हची मुख्य भूमिका!

BreakingNews

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! तब्बल ६ वर्षांनंतर दया, अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न पुन्हा एकत्र

साईभक्तांच्या श्रद्धेचा महापूर; शिर्डी साई संस्थानला वर्षभरात ६६० कोटींचे योगदान!

जी-७ परिषदेत मोदी-ट्रम्प भेट; भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याची ग्वाही!

साकीनाक्यात एफडीएची धडक कारवाई; २,५१० लिटर संशयित चिली व सोया सॉस जप्त!

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.