Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

क्रिकेटविश्वात विक्रम! एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 10, 2025
in क्रीडा
क्रिकेटविश्वात विक्रम! एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मेघालयाच्या आकाश चौधरीने सुरत येथे रणजी ट्रॉफीच्या प्लेट गटातील सामन्यात इतिहास रचला. अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना त्याने एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्री यांच्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. इतकेच नाही, तर अवघ्या ११ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत त्याने नवा विक्रमही प्रस्थापित केला. त्याने सलग आठ षटकारांची आतषबाजी केली.

वेगवान गोलंदाज असलेला आकाश चौधरी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्यावेळी मेघालय ६ बाद ५७६ धावांवर खेळत होता. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर त्याने दोन चेंडूंवर एकेरी धावा घेतल्या. त्यानंतर १२६ व्या षटकात लिमार दावीच्या गोलंदाजीवर त्याने सलग सहा षटकार लगावले. पुढील षटकातील पहिल्या दोन चेंडूंवरही त्याने षटकार खेचत अवघ्या ११ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. मेघालयने ६ बाद ६२८ धावांवर डाव घोषित केला, तेव्हा आकाशने १४ चेंडूंमध्ये आठ षटकारांसह नाबाद ५० धावा केल्या होत्या. याआधीचा ११ चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम लीस्टरशायरच्या वेन व्हाइटच्या नावावर होता, ज्याने २०१२ मध्ये १२ चेंडूंमध्ये हे यश मिळवले होते.

Previous Post

ठाण्यातील दांपत्याचे प्रेरणादायी लक्ष्य, दिल्ली ते मुंबई ‘गेट टू गेट’ सायकलिंग मोहिम!

Next Post

मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, अंधेरी पश्चिम-पूर्व पादचारी पूल अखेर फेरीवाला-मुक्त!

Next Post
मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, अंधेरी पश्चिम-पूर्व पादचारी पूल अखेर फेरीवाला-मुक्त!

मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, अंधेरी पश्चिम-पूर्व पादचारी पूल अखेर फेरीवाला-मुक्त!

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.