Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

“एकही हिंदू मुलगी सोडू नका..”, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबद्दल अश्लील चॅट

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 1, 2025
in गुन्हेगारी, पालघर
“एकही हिंदू मुलगी सोडू नका..”, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबद्दल अश्लील चॅट
Share on FacebookShare on Whatsapp

विरार : विरार येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. विरारच्या विवा कॉलेजमध्ये नवरात्री निमित्त गरबा सुरू आहे. गरब्यात येणाऱ्या दोन मुलींवर तरुणांनी सोशल मीडियावर केलेल्या अश्लील चॅटमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन तरुणाला अटक करण्यात आली आहे. चॅटमध्ये “एकही हिंदू मुलगी सोडू नका” तसेच इतर अश्लील आणि वादग्रस्त वाक्यांचा समावेश आहे. दोन तरुणांनी असे आक्षेपार्ह चॅट केले आहे. या चॅटमध्ये त्यांनी मुलींसोबत शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलले आहे. गरब्यात जी हिंदू मुलगी दिसेल तिच्याशी जवळीक कर असा सल्ला व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये देण्यात आल्याचा समोर आला आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी मुलींना कॉलेजमधील कुठला मजला निर्मनुष्य असेही या चॅटमध्ये सांगण्यात आले आहे. या संभाषणात गरब्यात असलेल्या मुलींवर कशा प्रकारे अत्याचार करता येईल असं त्या तरुणाने सांगितले आहे. अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर या चॅटमध्ये करण्यात आल्याचा समोर आलं आहे.

विरारच्या विवा महाविद्यालयात गुजराथी मित्रमंडळ आणि U238 या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. या गरब्यात येणाऱ्या मुलींसंदर्भात दोन तरूणांने आक्षेपार्ह चॅट व्हायरल झाले आहे. हे चॅट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विवा कॉलेज प्रशासनाने तत्काळ भूमिका घेत बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अश्लील आणि वादग्रस्त चॅट करणाऱ्या दोन आरोपीपैकी एका अल्पवईन आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे.

Previous Post

कल्याणमधील प्रसिद्ध शाळेच्या विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा, हाताला धागा-बांगड्या घालण्यास बंदी; पालकांमध्ये नाराजी व्यक्त

Next Post

राज्यात आगीचे सूत्र सुरूच; नालासोपाऱ्यात ९ मजली इमारतीत आग

Next Post
राज्यात आगीचे सूत्र सुरूच; नालासोपाऱ्यात ९ मजली इमारतीत आग

राज्यात आगीचे सूत्र सुरूच; नालासोपाऱ्यात ९ मजली इमारतीत आग

BreakingNews

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.