Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

कळवा रुग्णालयातील प्रकार; मुलीच्या शरीरात इंजेक्शनची सुई, १६ दिवस होऊनही लक्ष देण्यास डॉक्टरांना वेळ नाही

दोन महिन्यांपूर्वी रुग्णालयात १८ मृत्यू झाल्याने चर्चेत आलेले कळवा रुग्णालय पुन्हा एकदा निष्काळजीपणामुळे चर्चेत आले आहे. न्यूमोनिया आजारावरील उपचार घेण्यासाठी आलेल्या मुलीला इंजेक्शन देताना सुई तुटली. १६ दिवसांपासून तुटलेली सुई मुलीच्या शरीरात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 28, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
कळवा रुग्णालयातील प्रकार; मुलीच्या शरीरात इंजेक्शनची सुई, १६ दिवस होऊनही लक्ष देण्यास डॉक्टरांना वेळ नाही
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बेपर्वाईची मालिका अद्याप कायम आहे. येथे उपचारांसाठी आलेल्या एका मुलीच्या जांघेत इंजेक्शन देत असताना इंजेक्शनची सुई जांघेतच तुटली. या प्रकाराला १६ दिवस होऊनही या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास डॉक्टरांना वेळ नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सुई आतमध्ये राहिली होती, याची कबुली रुग्णालयाच्या वतीनेही देण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी निष्काळजीमुळे एका रात्रीत १८ मृत्यू झाले होते. या या प्रकरणामुळे कळवा रुग्णालय प्रशासनाची हलगर्जी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. कळवा रुग्णालयातील मृत्यूंच्या मालिकेमुळे सर्वच स्तरातून रुग्णालय प्रशासनावर टीका झाली होती. याप्रश्नी चौकशी समिती नेमण्यात आली होती. मात्र समितीच्या अहवालावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. त्यातच रुग्णालय प्रशासनाची हलगर्जी नवीन प्रकरणामुळे समोर आली आहे. एक महिन्यांपूर्वी ही १६ वर्षीय मुलगी उपचार घेण्यासाठी रुग्णालयात आली होती. यावेळी तिला इंजेक्शन देताना सुई जांघेतच तुटली. मात्र १६ दिवस उलटूनही याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही, असे ‘एक्स’वर ट्वीट करून आमदार आव्हाड यांनी हा प्रकार उघडकीस आणला.

या मुलीला न्यूमोनिया झाला होता. खूप गंभीर परिस्थितीत तिला आणण्यात आले होते. सलाइन लावण्यासाठी नस मिळत नसल्याने सेंट्रल लाइन गाइड वापर करून पायाच्या नसांमधून इंजेक्शन देण्यात येत होते. यावेळी तिच्या शरीरात ती गाइड वायर राहिली आहे, असे रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कळवा रुग्णालयाकडे इंटरविनायल रेडिओलॉजिस्ट आणि कर्डिॲक सर्जन नसल्याने तिला पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र अशा पद्धतीने रुग्णाच्या जीवाचे काही बरेवाईट झाले, तर त्या मुलीचा पाय कापावा लागेल. इतकी बेपर्वाई डॉक्टर कसे काय करू शकतात, इंजेक्शन देत असताना सुई तुटतेच कशी? असे प्रश्न आव्हाड यांनी यांनी ट्वीटच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.

Previous Post

मध्य रेल्वेच्या ४६६ स्थानकात प्रथम क्रमांक; स्वच्छतेत ठरले ठाणे रेल्वे स्थानक बेस्ट

Next Post

साधूंच्या वेशात चार आतंकवादी, रेल्वे हेल्पलाइनवर पोस्ट; चौघांना ताब्यात घेतलं

Next Post
साधूंच्या वेशात चार आतंकवादी, रेल्वे हेल्पलाइनवर पोस्ट; चौघांना ताब्यात घेतलं

साधूंच्या वेशात चार आतंकवादी, रेल्वे हेल्पलाइनवर पोस्ट; चौघांना ताब्यात घेतलं

BreakingNews

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.