Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

डोंबिवली जवळील २७ गावांमध्ये दुचाकीवरील लुटारूंचा धुडगुस

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 22, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
डोंबिवली जवळील २७ गावांमध्ये दुचाकीवरील लुटारूंचा धुडगुस
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : आतापर्यंत डोंबिवली शहराच्या ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता, एमआयडीसी परिसरात दुचाकीवरून येऊन पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या लुटारूंनी आपला म्होरा डोंबिवली जवळील २७ गाव परिसराकडे वळविला आहे. २७ गाव परिसरात नवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. सकाळ, संध्याकाळ नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात. कामावर जातात. अशा पादचाऱ्यांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा किमती ऐवज हिसकावून पळून जाण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. गेल्या दहा दिवसापूर्वी आजदे गाव हद्दीत एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची ६० हजार रूपये किमतीची साखळी चोरट्यांनी चोरून नेली होती. ९० फुटी रस्ता भागात चामुंडा सोसायटी परिसरात एका वृध्देच्या गळ्यातील सोन्याची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी चोरून नेली होती. या गुन्हे प्रकरणातील चोरटे मानपाडा पोलिसांनी उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केले आहेत.

अशाप्रकारे पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरणारी एक आंतरराज्य टोळी कल्याण, डोंबिवलीच्या पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील महत्वाचे म्होरके पोलीस जाळ्यात अडकले तरी त्यांची नवीन पैदास होत असल्याने पादचारी संतप्त होत आहेत. एका टोळीतील महत्वाचे म्होरके पोलिसांनी पकडल्यावर किमान आता तरी दुचाकीवरून येणाऱ्या लुटारूंची दहशत थांबेल असे वाटत असतानाच, तात्काळ काही दिवसात पुन्हा लुटीचे नवीन प्रकार नवीन भागात सुरू होत आहेत. २७ गाव भागात असे दुचाकीवरून येणारे लुटारू स्थानिक ग्रामस्थांच्या तावडीत लूट करताना सापडले तर मात्र त्यांना ग्रामस्थांकडून बेदम प्रसाद दिला जाण्याची शक्यता आहे. २७ गाव भागात पळण्यासाठी गावातून एक ते दोन रस्ते असतात. त्यामुळे गाव हद्दीत या चोरट्यांनी लूट केली तर त्यांना कोंडून पकडून आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.

Previous Post

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे निधन

Next Post

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) बाबत ठाणे पोलिसांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना

Next Post
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) बाबत ठाणे पोलिसांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) बाबत ठाणे पोलिसांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.