वृत्तसंस्था : मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गाण्यांना आवाज देणारे प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झुबिन गर्ग यांचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे.
आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनी झुबिन गर्ग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘झुबिन यांच्या संगीतात, अनेक पिढ्यांना आनंद, सांत्वन आणि ओळख मिळाली. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. आसामने त्यांच्या सर्वात प्रिय पुत्रांपैकी एक गमावला आहे. भारताने एक सर्वोत्तम कलाकार गमावला आहे. त्यांच्या आत्माला शांती लाभो’, असे अशोक सिंघल यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

