Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) बाबत ठाणे पोलिसांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 22, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) बाबत ठाणे पोलिसांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : सध्या समाजमाध्यमावर छायाचित्र अपलोड करुन विविध ट्रेंड सेट करण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणात वाढू लागले आहेत. परंतु हे घातक ठरू शकते अशी सतर्कतेची सूचना ठाणे पोलिसांनी केली आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) आधारे तुमच्या छायाचित्राचा गैरवापर करुन तुमच्या संपूर्ण आयुष्याचाच घात होऊ शकतो. ठाणे पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. इंटरनेच्या जगात समाजमाध्यमांवर लाईक, फालोवर्स, सबस्क्राईबर मिळविण्यासाठी अनेकजण त्यांचे छायाचित्र, व्हिडीओ विविध समाजमाध्यमांवर प्रसारित करतात. प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेत्यांचे, राजकीय नेत्यांचे छायाचित्र वापरून एआय तंत्रज्ञानाच्या आधारे त्याचा गैरवापर करुन अनेक प्रकरणे उघडकीस आली होती. आता सर्वसामान्य नागरिक विशेषत: महिला, तरुणी या देखील असुरक्षित आहेत. एआय या तंत्रज्ञानाचा गैर वापर वाढल्यास काय होऊ शकते याची कल्पना करा. ठाणे पोलिसांनीही नागरिकांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. पोलिसांनुसार, लोक बहुतेक वेळा “स्टोरीसाठी” किंवा मित्रांसाठी ठेवलेले फोटो कुठे जातात, कोण त्यांचा वापर करतो याची कल्पना ठेवत नाहीत. परंतु आजकालचे एआय आधारित साधने आणि मोफत उपलब्ध ॲप्स एका क्लिकमध्ये चेहरा बदलून किंवा फोटो मॉर्फ करून चुका संदर्भातील प्रतिमा तयार करू शकतात. या प्रतिमांचा वापर करून प्रत्यक्ष व्यक्तींचे फोटो डार्क वेबवर विकले जातात आणि त्यावरून ब्लॅकमेलिंगही केले जातेय काही वेळा पीडितांना त्याची माहिती देखील नसते.
ठाणे पोलिसांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना
• आज तुम्ही जो फोटो फक्त “स्टोरीसाठी” टाकता, तो फोटो कुठे जातोय, कोण सेव्ह करतोय, याची तुम्हाला कल्पना सुद्धा नसते.
• AI Deepfake तंत्रज्ञान आता इतकं सहज आणि सगळ्यांच्या हाती आलंय की एका फोटोवरून फेक, अश्लील व्हिडिओ तयार होऊ शकतो. याचा वापर करून ब्लॅकमेल करणं, फेक प्रोफाइल्स तयार करणं, फोटो मॉर्फ करणं हे आज शक्य आहे.
• डार्क वेबवर हजारो महिलांचे फोटो विकले जातात, काही वेळेस त्यांना स्वत:लाही हे माहित नसतं.
• इंस्टाग्राम-फेसबुकवर प्रायव्हेट खाते असूनही हजारो रिक्वेस्ट्स, ‘डीएम’ का येत असतील बरं?
• स्क्रीनशॉट, स्क्रीन रेकॉर्डिंग, एआय टूल्स वापरून कोणताही फोटो डाउनलोड होतोच. एकदा फोटो, व्हिडिओ पोस्ट केला की तो “तुमचा” राहत नाही.
• सोशल मीडिया ही तुमची ओळख बनवते, पण ती चुकीची कुणाच्या हाती गेली, तर आयुष्यभराची शांती हिरावते.

Previous Post

डोंबिवली जवळील २७ गावांमध्ये दुचाकीवरील लुटारूंचा धुडगुस

Next Post

एपीएमसी मार्केटमध्ये गुटखा विक्रेत्यावर अन्न-औषध प्रशासन व पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन जण ताब्यात

Next Post
एपीएमसी मार्केटमध्ये गुटखा विक्रेत्यावर अन्न-औषध प्रशासन व पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन जण ताब्यात

एपीएमसी मार्केटमध्ये गुटखा विक्रेत्यावर अन्न-औषध प्रशासन व पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन जण ताब्यात

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.