Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

ठाण्यात बोगस माथाडींचा सुळसुळाट

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 19, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
ठाण्यात बोगस माथाडींचा सुळसुळाट
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाण्यातील सर्वात जुन्या वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रात आता व्यवसाय करणे कठीण होते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्यातील एका व्यवसायिकाकडून माथाडीच्या नावाने खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाला. खंडणी दिली नाही म्हणून त्याच्या मालवाहू गाड्या अडविण्यात आल्या. याप्रकरणी त्या व्यवसायिकाने तक्रार दाखल केल्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट भागात मोठ्याप्रमाणात लघु उद्योग आहे. या उद्योगांच्या माध्यमातून हजोरोंना रोजगार उपलब्ध होतो. मागील काही वर्षांमध्ये येथे आयटी कंपन्यांची स्थापना झाल्या. तसेच वागळे इस्टेट भागात नागरी वस्ती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे हळू हळू येथील लघु उद्योग कमी होत चालले आहेत का, असा प्रश्नही पडत आहे. उद्योजकांना सुरक्षित वातावरण देणे हे सरकारचे काम आहे. परंतु काही बोगस माथाडी कामागार संघटनांच्या नावाने टोळ्या तयार झाल्या असून त्यांच्याकडून व्यवसायिकांना त्रास देण्याची कामे होत आहे. या विषयी ठाणे पोलीस आयुक्तालयातही पोलीस आणि उद्योजकांमध्ये अनेक बैठका पार पडल्या होत्या.

त्यातच वागळे इस्टेट भागात एक प्रकरण समोर आले आहे. ठाण्यातील एका व्यवसायिकाचा विजेरी विक्राचा व्यवसाय असून काही महिन्यांपूर्वीच त्यांनी रोड क्रमांक १२ येथे एक दुकान खरेदी केले होते. त्याच्या सजावटीचे काम गाळ्यात सुरु असताना सहा ते सात महिन्यांपूर्वी एक व्यक्ती त्यांच्या कार्यालयात आला. येथे येणाऱ्या वाहनांसाठी ७२ हजार रुपये माथाडी कामासाठी द्यावे लागतील. तसेच प्रत्येक वाहन आणि वस्तू मागे वेगळे पैसे द्यावे लागतील असे सांगितले. काही दिवसांनी तो व्यक्ती त्याच्या इतर दोन साथिदारांसह गाळ्यामध्ये येऊन काम रोखण्याचा प्रयत्न करु लागला होता. परंतु व्यवसायिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. काही दिवसांपूर्वी त्या तिघांनी व्यवसायिकाच्या गाळ्यासाठी लागणाऱ्या सजावटीच्या सामानाचे वाहन अडवून ठेवले. अखेर व्यवसायिकाने याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

ठाण्यात पक्षीपालनगृहासाठी राज्य शासनाने पालिकेला दिला १० कोंटींचा निधी

Next Post

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ अॅप, शेतीविषयक व योजना विषयक माहिती होणार उपलब्ध

Next Post
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ अॅप, शेतीविषयक व योजना विषयक माहिती होणार उपलब्ध

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ अॅप, शेतीविषयक व योजना विषयक माहिती होणार उपलब्ध

BreakingNews

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.