Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाची मोठी कामगिरी, वाळेकरांच्या हल्ल्याप्रकरणी १४ वर्षांनी आरोपीला अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 18, 2025
in गुन्हेगारी, ठाणे, ताज्या बातम्या
ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाची मोठी कामगिरी, वाळेकरांच्या हल्ल्याप्रकरणी १४ वर्षांनी आरोपीला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

अंबरनाथ : अंबरनाथ शिवसेनेचे नेते अरविंद वाळेकर यांच्यावर २०११ वर्षात शिवसेना शाखेत झालेल्या हल्ल्याप्रकरणातील एका आरोपीला तब्बल १४ वर्षांनी अटक करण्यात आली आहे. ठाणे शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाने तब्बल १४ वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या फरार आरोपीला गुजरातमधून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. भैय्याजी उर्फ राजेश रामशिरोमणी शुक्ला (वय ५१, मूळगाव – सुकुलपूर, जिल्हा सुलतानपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. सुरत, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

२४ नोव्हेंबर २०११ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता अंबरनाथ (पूर्व) येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवसेनेचे अरविंद शिवलिंग वाळेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. २३ नोव्हेंबर २०११ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास वाळेकर शिवसेना शाखा, अंबरनाथ (पूर्व) येथे आले असताना दोन अज्ञात इसमांनी शाखेमध्ये प्रवेश करून रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. यात वाळेकर यांचा अंगरक्षक शामसुंदर यादव याचा मृत्यू झाला. यानंतर दुसरा अंगरक्षक राकेश यादव याने स्वसंरक्षणार्थ केलेल्या प्रत्युत्तर गोळीबारात आरोपी मनिष कुमार उर्फ बबलू झा/शर्मा ठार झाला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. अंबरनाथ शहरातील रक्तरंजित इतिहास पाहता या घटनेने मोठा गदारोळ झाला होता. या घटनेत बबुसिंग उर्फ नंदलाल शहा, ब्रिजेश हर्षबहादुर सिंग, प्रदीप जावरेकर, राजेश उर्फ गोरखनाथ सिंह या आरोपींना अटक झाली होती. मात्र मुख्य आरोपींपैकी भैय्याजी उर्फ राजेश शुक्ला हा १४ वर्षे फरार राहून पोलिसांना चकवा देत होता. मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षातील दादासाहेब पाटील यांनी समांतर तपास करत आरोपीच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी सुरत जिल्ह्यात पलसाना येथे राहत असल्याची खात्री पटली. वरिष्ठांच्या परवानगीने पोलिस पथक गुजरातला रवाना झाले. १६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी पलसाना चौक, सुरत येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने भैय्याजी शुक्ला याला ताब्यात घेण्यात आले.

Previous Post

“आधी पादचारी पूल उभारा, त्यानंतरच..”, अंबरनाथ रेल्वे रूळांशेजारी भिंत उभारण्यास स्थानिकांचा विरोध

Next Post

मुंबईतील केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण, तुतारी एक्स्प्रेसमधून आरोपीला अटक

Next Post
मुंबईतील केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण, तुतारी एक्स्प्रेसमधून आरोपीला अटक

मुंबईतील केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण, तुतारी एक्स्प्रेसमधून आरोपीला अटक

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.