Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

जिल्हा परिषदेच्या ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांना घरपोच दाखले

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 11, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
जिल्हा परिषदेच्या ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांना घरपोच दाखले
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : सामान्य नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारात सहज, सुलभ आणि जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने काही महिन्यांपूर्वी ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’(Door Step Delivery) हा अभिनव उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांना घरपोच दाखले देण्यात जिल्हापरिषदेला यश आले आहे.

‘डोअर स्टेप डिलिव्हरी’(Door Step Delivery) या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना घरबसल्या शासनाच्या विविध सेवा मिळत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम लोकाभिमुख आणि परिणामकारक ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दारी सेवा उपलब्ध करून देणे, हेच खऱ्या अर्थाने सुशासनाचे प्रतीक आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करत आहोत. हा उपक्रम प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा जिल्हा परिषदेचा संकल्प आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या ४०२ प्रकारच्या शासकीय सेवा मिळत आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ४ हजार १३ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३ हजार ६५९ नागरिकांना घरपोच सेवा देण्यात आली आहे. उर्वरित १७० अर्जांवर काम सुरू असल्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.

Previous Post

नेपाळमध्ये अडकले १५० महाराष्ट्रीय पर्यटक, सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील

Next Post

वाशी महाराजा मार्केट परिसरात गर्दुल्ल्यांकडून महिलेची छेडछाड

Next Post
वाशी महाराजा मार्केट परिसरात गर्दुल्ल्यांकडून महिलेची छेडछाड

वाशी महाराजा मार्केट परिसरात गर्दुल्ल्यांकडून महिलेची छेडछाड

BreakingNews

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; मे महिन्याचा हप्ता १२ ते १५ जूनदरम्यान खात्यात जमा होणार!

पुण्यात भाडे नाकारणाऱ्या ४८४ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; ९ जण निलंबित!

ठाण्यातील अनेक भागांत शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद!

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.