वृत्तसंस्था : ५०० रुपयांची नोट बंद होणार असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय. सप्टेंबरपर्यंत १०० आणि २०० च्या ७५ टक्के नोटा एटीएममध्ये लोडिंग करा अशा सूचना आरबीआयने बँकांना दिल्याचा दावा करण्यात आलाय.पण, खरंच ५०० रुपयांची नोट बंद करण्याचा सरकारचा प्लान आहे का?
सप्टेंबरपर्यंत ७५ टक्के आणि मार्चपर्यंत ९० टक्के १००-२०० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये टाका अशा सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्याचा दावा केलाय. इतकंच नव्हे तर मार्च २०२६ पर्यंत ५०० रुपयांची नोट बंद करणार असल्याचा दावा केलाय. पण, या दाव्यात कितपत तथ्य आहे? खरंच ५०० रुपयांची नोट बंद करण्याचा सरकारचा विचार आहे का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती आरबीआयकडूनच मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमने याबाबत अधिक माहिती मिळवली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
- ५०० रुपयांचीनोट बंद होणार नाही
- व्हायरल व्हिडिओतून केलेला दावा खोटा
- ५०० रुपयांची नोट चलनात कायम राहणार
- ATMमध्ये १००,२०० आणि ५०० च्या नोटा उपलब्ध
- लोकांची दिशाभूल करण्यासाठी चुकीचा दावा
५०० रुपयांची नोट ही चलनात कायम राहणार आहे. सोशल मीडियावरून चुकीचे मेसेज, व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जातेय. मात्र, आमच्या पडताळणीत ५०० रुपयांची नोट बंद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय.

