Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

धावत्या बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने सरळगाव रस्त्यावर अपघात, सहा प्रवासी जखमी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 8, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
धावत्या बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने सरळगाव रस्त्यावर अपघात, सहा प्रवासी जखमी
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण बस आगाराच्या कल्याण आळेफाटा धावत्या बसच्या स्टेअरिंगचा रॉड रविवारी सकाळी मुरबाड सरळगाव रस्त्यावरील एका गाव हद्दीत अचानक तुटला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटताच बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या झुडपांमधून एका झाडाला जाऊन आदळली. बस सपाटीला असताना हा अपघात झाल्याने मोठी हानी टळली. या अपघातात सहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते. चालकाने प्रसंगावधान राखल्याने त्यालाही किरकोळ दुखापत झाली. वाहकालाही मुका मार लागला आहे. दोन महिन्यापूर्वीच कल्याण बस आगाराच्या एका धावत्या बसचे पुढील चाक कल्याण मुरबाड रस्त्यावर गोवेली भागात अचानक निखळून बस रस्त्याला घासत जाऊन पुढे थांबली होती. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच सोमवारी माळशेज घाटमार्गे जाणाऱ्या कल्याण आळेफाटा बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने अपघात झाला. ही घटना माळशेज घाट मार्गात झाली असती तर किती मोठी दुर्घटना घडली असती अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

अशाप्रकारच्या या सततच्या अपघातामुळे कल्याण बस आगारातील वाहन दुरुस्ती कार्यशाळेत बसची योग्यरितीने देखभाल दुरुस्ती केली जाते की नाही याचीही चौकशी होण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून देण्यात येत आहेत. असे अपघात वारंवार होत असतील तर परिवहन विभागाने कल्याण बस आगाराच्या वाहन दुरुस्ती कार्यशाळेत कामगारांच्या मागण्या, तेथील तांत्रिक त्रृटी याची माहिती घ्यावी आणि ही कार्यशाळा पूर्ण क्षमतेने चालेल याची दक्षता घेण्याची मागणी प्रवासी करत आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक दिवस कल्याण बस आगाराला भेट देण्याची मागणी या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

गेटवे ते जेएनपीए प्रवास होणार ४० मिनिटांत पूर्ण, २२ सप्टेंबरपासून ई वॉटर टॅक्सी सेवा सुरु

Next Post

मानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल; आईने घेतला चिमुकलीसह गळफास

Next Post
मानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल; आईने घेतला चिमुकलीसह गळफास

मानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल; आईने घेतला चिमुकलीसह गळफास

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.