Lokrakshanay
Saturday, June 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

गेटवे ते जेएनपीए प्रवास होणार ४० मिनिटांत पूर्ण, २२ सप्टेंबरपासून ई वॉटर टॅक्सी सेवा सुरु

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 8, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
गेटवे ते जेएनपीए प्रवास होणार ४० मिनिटांत पूर्ण, २२ सप्टेंबरपासून ई वॉटर टॅक्सी सेवा सुरु
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) असा प्रवास एक तासांऐवजी केवळ ४० मिनिटांत पूर्ण करण्याचे प्रवाशांचे, जेएनपीए कर्मचार्यांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. गेटवे ते जेएनपीए जलमार्गावर ई वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय जेएनपीएने घेतला आहे. त्यानुसार दोन ई वॉटर टॅक्सी तयार झाल्या असून २२ सप्टेंबरपासून या ई वॉटर टॅक्सी गेटवे ते जेएनपीएदरम्यान धावणार आहेत, सेवेत दाखल होणार आहे.

गेटवे ते जेएनपीएदरम्यान जलप्रवासासाठी सध्या लाकडी बोटी आहेत. त्यातून प्रवास करण्यासाठी एक तास किंवा कधी त्याहीपेक्षा अधिक वेळ लागतो. त्यात सर्व लाकडी बोटी आता जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे जेएनपीएने या मार्गावर विद्युत वॉटर टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अतिजलद आणि सुरक्षित प्रवास हा उद्देश या मागे होताच, पण त्याचवेळी प्रदूषण कमी करणारी सेवा या जलमार्गावर सुरु करण्याचेही उद्दिष्ट जेएनपीएचे होते. त्यामुळे या मार्गावर ई वॉटर टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आधी या टॅक्सी परदेशात तयार करण्यात येणार होत्या. पण नंतर त्या भारतातच तयार करण्याचा निर्णय घेत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला हे काम देण्यात आले. या वॉटर टॅक्सी तयार होऊन यापूर्वीच सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक कारणाने ई वॉटर टॅक्सी तयार होण्यास विलंब झाला. आता मात्र दोन ई वॉटर टॅक्सी सेवेत दाखल होण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. २२ सप्टेंबरपासून ई वॉटर टॅक्सी सुरु होणार असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली. भारतात बांधणी झालेल्या या दोन वॉटर टॅक्सीपैकी एक वॉटर ट्रक्सी सौर ऊर्जेवर चालणारी तर दुसरी पूर्णत विद्युत वॉटर टॅक्सी आहे. या बोटींची प्रवासी क्षमता २० प्रवासी अशी असून गेटवे ते जेएनपीए प्रवासासाठी १०० रुपये असे तिकिट दर असण्याची शक्यता आहे. या ई वॉटर टॅक्सीच्या संचलन आणि देखभालीची जबाबदारी भारत फ्रेट ग्रुप यांच्याकडे देण्यात आली आहे.

Previous Post

कारागृहातून सुटलेल्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस गंभीर जखमी

Next Post

धावत्या बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने सरळगाव रस्त्यावर अपघात, सहा प्रवासी जखमी

Next Post
धावत्या बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने सरळगाव रस्त्यावर अपघात, सहा प्रवासी जखमी

धावत्या बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने सरळगाव रस्त्यावर अपघात, सहा प्रवासी जखमी

BreakingNews

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!

मलंगगडाचा कायापालट! ३५०० पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी ‘खाकीतील सखी’ उपक्रमाला बळ; ठाणे स्थानकात जनजागृती मोहीम!

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.