Lokrakshanay
Tuesday, April 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्यात १५ हजार पोलीसांची भरती, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची मंजुरी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 13, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
राज्यात १५ हजार पोलीसांची भरती, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची मंजुरी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्य पोलीस दलात १५ हजार शिपायांची भरती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. २०२४-२५ पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबरोबरच २०२२ व २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळ विशेष बाब म्हणून अर्ज करून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी देण्यास मंजुरी देण्यात आली.

करोनामुळे पोलीस शिपायांची भरती होऊ शकली नव्हती. दोन-तीन वर्षे भरती न झाल्याने आणि या कालखंडात हजारो कर्मचारी निवृत्त झाल्याने पोलीस शिपायांचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा राज्य सुरक्षा महामंडळाकडून हंगामी किंवा तात्पुरत्या स्वरूपातही पोलीस शिपाई घेण्यात आले होते. आता राज्य सरकारकडून नियमित पोलीस भरतीला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्य पोलीस दलातील शिपायांची २०२४ मध्ये रिक्त असलेली आणि २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे. भरतीसाठी अर्ज मागविणे, अर्जांची छाननी प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखीपरीक्षा यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार हे प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

Previous Post

दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याची मागणी – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

“कबुतरांना खाणे दिले नाही, तर ते मरतील, ही समजूत चुकीची”, डॉ. कल्याण गंगवाल यांची माहिती

Next Post
“कबुतरांना खाणे दिले नाही, तर ते मरतील, ही समजूत चुकीची”, डॉ. कल्याण गंगवाल यांची माहिती

“कबुतरांना खाणे दिले नाही, तर ते मरतील, ही समजूत चुकीची”, डॉ. कल्याण गंगवाल यांची माहिती

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.