Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध नाहीत, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आश्वासन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 21, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध नाहीत, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आश्वासन
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : ‘यंदाच्या गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत,’ असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. ‘उत्सवासाठी गेल्या वर्षीची परवानगीही ग्राह्य धरली जाईल. वेगळ्या पोलीस परवानगीची आवश्यकता नाही,’ असेही त्यांनी सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा पारिषोतिक वितरण समारंभ रविवारी झाला. त्या वेळी ते बोलत होते. जगद्गुरू कृपांकित डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भोसले मार्ग भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, एरंडवण्यातील श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील पोटसुळ्या मारुती मंडळाने तृतीय, नवी खडकी येरवडा येथील नवज्योत मित्र मंडळ ट्रस्टने चौथे तर भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेत सहभागी झालेल्या १९४ मंडळे आणि शाळांपैकी १०६ मंडळे तसेच शाळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १४ लाख ९५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५) साजरे करणारे मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

Previous Post

पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवीन इमारती

Next Post

खाडी परिसरात हातभट्टी विरोधात महसूल विभागाची कारवाई; ३३ हजार ६०० लिटर रसायन नष्ट

Next Post
खाडी परिसरात हातभट्टी विरोधात महसूल विभागाची कारवाई; ३३ हजार ६०० लिटर रसायन नष्ट

खाडी परिसरात हातभट्टी विरोधात महसूल विभागाची कारवाई; ३३ हजार ६०० लिटर रसायन नष्ट

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.