Lokrakshanay
Tuesday, May 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अमित शाह पुन्हा महाराष्ट्रात; भाजपा नेत्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 1, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
अमित शाह पुन्हा महाराष्ट्रात; भाजपा नेत्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते मुंबई, ठाणे इथल्या भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या २ आठवड्यात शाह दुसऱ्यांदा राज्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाह यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. भाजपा नेत्यांकडून शाह निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

अमित शाह हे २ दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून यावेळी ते कोपरखैरणेतील संघ शाखेलाही भेट देणार आहेत. संघ प्रचारकांसोबत शाह १ तास चर्चा करणार आहेत. मागील आठवड्यात शाह यांनी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील तयारीचा आढावा घेतला. आज ते नवी मुंबईतल्या वाशी इथं कोकण, ठाणे, पालघर विभागातील नेते, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि संघ यांच्यातील समन्वयासाठी विधानसभा संयोजक नेमले गेलेत. त्यामुळे शाह यांच्या या दौऱ्यात ते संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा करतील.

मंगळवारी दुपारी अमित शाह मुंबईतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. सायंकाळी ते कोपरखैरणेतील संघ शाखेत जातील. वाशीतील सिडको सभागृहातही शाह यांची बैठक होणार आहे. त्यानंतर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं पोहचतील. रात्री उशिरा ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील अशी माहिती आहे. याठिकाणी मुक्काम करून दुसऱ्या दिवशीही पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ते दिल्लीला रवाना होतील.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर लगेच महापालिका निवडणुकाही लागणार आहेत. त्यात भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत तयारीचा आढावा शाह यांना देण्यात येईल. सध्या ठाणे, कोकणात भाजपाची काय स्थिती याचाही आढावा शाह यांच्याकडून बैठकीत घेतला जाईल. मुंबईतील लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर मुंबई वगळता एकाही जागेवर यश मिळालं नाही. ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला. तर सिंधुदुर्गात नारायण राणे आणि पालघर येथे हेमंत सावरा यांनी भाजपाकडून विजय मिळवला आहे.

Previous Post

अक्षय शिंदेचा मृतदेह पुरलेल्या परिसरात पोलिसांचा २४ तास पहारा; दफनभूमीत सीसीटीव्ही लागला

Next Post

कल्याणमध्ये १२५ किलो बनावट तूप, लोणी जप्त; बाजार परवाना विभागाची कारवाई

Next Post
कल्याणमध्ये १२५ किलो बनावट तूप, लोणी जप्त; बाजार परवाना विभागाची कारवाई

कल्याणमध्ये १२५ किलो बनावट तूप, लोणी जप्त; बाजार परवाना विभागाची कारवाई

BreakingNews

पुण्याचे बुधवार पेठ बनले ‘मिनी बांगलादेश’! ११ महिन्यांत १०३ बांगलादेशी ताब्यात

खारेगाव टोलनाक्याजवळ ‘एडिबल ऑईल’च्या नावाखाली डिझेल तस्करी उघड; ४६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

LPG गॅस २५ दिवसांपूर्वी संपला? जाणून घ्या ग्राहकांसाठी उपलब्ध ३ महत्त्वाचे पर्याय

पालघरमध्ये ४,१५० कोटींचे अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्स; महाराष्ट्राला मिळणार जागतिक सागरी हबची ओळख

गावदेवी भाजी मंडई दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना मिळणार १० लाखांची मदत

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.