Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

कल्याणमध्ये १२५ किलो बनावट तूप, लोणी जप्त; बाजार परवाना विभागाची कारवाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 1, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
कल्याणमध्ये १२५ किलो बनावट तूप, लोणी जप्त; बाजार परवाना विभागाची कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार परवाना विभागाने येथील गफूरडोन चौक भागात सोमवारी दुपारी बनावट तूप आणि लोण्याचा १२५ किलो साठा जप्त केला आहे. भिवंडीतून हा बनावट वस्तूंचा साठा कल्याणमध्ये विक्रीसाठी आणण्यात आला होता. अन्न आणि औषध प्रशासन विभाग, बाजारपेठ पोलिसांना या प्रकरणाची पालिकेने माहिती दिली. याप्रकरणाचा तपास पालिका, पोलिसांनी सुरू केला आहे. भिवंडीतील निजामपुरा भागात राहणारे मोमीन अब्दुल मुनाफ हरून रशीद , तौसिफ इक्बाल काझी (रा. खडकरोड, तीनबत्ती नाका, भिवंडी) अशी बनावट साठा विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या इसमांची नावे आहेत. तुपाचे १२५ किलो वजनाचे पाच खोके, ३० किलो वजनाच्या दोन खोक्यांमध्ये लोणी होते. पालिकेच्या बाजार परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांना भिवंडीतील काही इसम एका मोटीरमधून बनावट तूप, लोणी कल्याणमधील गफूरडोन चौक भागातील दुकानांमध्ये विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीप्रमाणे साहाय्यक आयुक्त ठाकुर, बाजार परवाना विभागातील प्रशांत धिवर आणि सहकारी कर्मचारी तातडीने गफूरडोन चौकात दाखल झाले. त्यावेळी एका मोटारीतून एका दुकानात मोटारीतून तूप, लोण्याचे खोके उतरविण्याचे काम सुरू होते. साहाय्यक आयुक्त ठाकुर यांनी या तूप, लोणी खरेदीच्या पावत्या आणि ते कोठुन आणले आहे याची माहिती इसमांकडे मागितली. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. इसमांनी कुर्ला येथून लोणी खरेदी केल्याच्या पावत्या दाखविल्या. तूप खरेदीच्या पावत्या ते दाखवू शकले नाहीत. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने बाजार परवाना पथकाने तूप, लोणी जप्त केले. याबाबतची माहिती बाजारपेठ पोलीस, अन्न आणि औषध प्रशासन विभाग ठाणे यांना देण्यात आली. या वस्तुंची शुध्दता तपासण्यासाठी तूप, लोणीचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. अशाचप्रकारे तूप वाहून नेणारे एक वाहन अन्य भागात गेल्याची माहिती पथकाला मिळाली. पण त्याचा वाहन क्रमांक इतर माहिती वेळीच न मिळाल्याने तो वाहन चालक पळून गेल्याची चर्चा होती.

Previous Post

अमित शाह पुन्हा महाराष्ट्रात; भाजपा नेत्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार

Next Post

रत्नागिरीतील मुळ्ये हायस्कूल- महाविद्यालयातील तीन मुलींचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
रत्नागिरीतील मुळ्ये हायस्कूल- महाविद्यालयातील तीन मुलींचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरीतील मुळ्ये हायस्कूल- महाविद्यालयातील तीन मुलींचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.