Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सात जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, माजी साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, तत्कालीन पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 28, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सात जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सात जणांविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे तपास सुरू करून मला आणि इतर व्यवसायिकांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी देऊन आमच्याकडून पैसे उकळले असे तक्रारीत म्हटले आहे. या गुन्ह्यामुळे आता संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, माजी साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, तत्कालीन पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधीत हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई येथे व्यवसायिक संजय पुनमिया वास्तव्यास आहेत. मिरा भाईंदरमध्ये काही विकासकांनी युएलसीच्या सवलतीसाठी बनावट प्रमाणपत्रे मिळवली होती.या बनावट पत्राच्या आधारे विकासकांनी महापालिकेकडून परवानग्या घेऊन इमारतींचे बांधकाम केले आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी २०१६ मध्ये ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संजय पुनमिया यांच्याविरोधात देखील हा गुन्हा दाखल होता. हे प्रकरण २०२१ मध्ये पुन्हा उघडण्यात आले होते. हे खोटे प्रकरण पुन्हा उघडून राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकविण्याची धमकी देऊन पैसे उकळल्याचा आरोप पुनमिया यांनी केला आहे. तसेच, शासनाचे खोटे पत्र तयार करून विशेष सरकारी वकिल नेमण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, तत्कालीन पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामुळे पांडे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Previous Post

पतीची अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने केली हत्या

Next Post

डोंबिवलीत चोरट्याने मोटारींच्या काचा फोडून केली दोन लाख ९५ हजार रूपयांचा चोरी….

Next Post
कल्याणमध्ये बेकायदेशीररीत्या बांधलेल्या इमारतीतील घरं विकून १० जणांची फसवणूक

डोंबिवलीत चोरट्याने मोटारींच्या काचा फोडून केली दोन लाख ९५ हजार रूपयांचा चोरी....

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.