Lokrakshanay
Tuesday, May 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

डोंबिवली : लोकल ट्रेनमधून प्रवासी पडून जखमी

छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या, प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमधील दरवाजात उभा असलेला एक प्रवासी रेल्वे मार्गात पडून गंभीर जखमी झाला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 12, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
डोंबिवली : लोकल ट्रेनमधून प्रवासी पडून जखमी
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या डोंबिवली जवळील कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या, प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमधील दरवाजात उभा असलेला एक प्रवासी रेल्वे मार्गात पडून गंभीर जखमी झाला आहे. कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. एक प्रवासी लोकलमधून पडल्याची माहिती गार्डने मोटरमनला देताच. काही क्षण तेथे लोकल थांबवून काही प्रवाशांना पडलेल्या प्रवाशाला मदत करण्यासाठी तेथे उतरण्यास सांगण्यात आले. पडलेल्या प्रवाशाच्या डोक्याला सर्वाधिक मार लागल्याने त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू होता. तो बेशुध्दावस्थेत होता.

पाच प्रवाशांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. दिवा आणि कोपर दोन्ही रेल्वे स्थानके अपघात स्थळापासून दूर होती. त्यामुळे या प्रवाशांनी डोंबिवलीकडून येणाऱ्या एका लोकलला हात केला. काही क्षण प्रवासी पडल्याच्या ठिकाणी थांबविण्यात आली. जखमी प्रवाशाला एका डब्यात चढवून त्याला दिवा येथे रेल्वे सुरक्षा जवानांच्या ताब्यात पुढील उपचारासाठी देण्यात आले. या प्रवाशाची अद्याप ओळख पटली नव्हती. हा प्रवासी कल्याणकडून येणाऱ्या अतिजलद लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करत होता. डोंबिवली, कोपरनंतर लोकलने वेग घेताच, या प्रवाशाचा तोल गेला असावा आणि तो रेल्वे मार्गात पडला असण्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे. दर आठवड्याला दोन ते तीन प्रवासी कोपर ते मुंब्रा रेल्वे मार्गात पडून मृत्युमुखी पडत असल्याने याविषयाची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची मागणी विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी वेळोवेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. उपनगरी रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांबरोबरच्या प्रत्येक बैठकीत या भागातील अपघातांचा विषय उपस्थित करून अधिकाऱ्यांना याविषयी काही उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.

Previous Post

प्रियकराकडून प्रेयसीचा विश्वासघात, बळजबरीने केला बलात्कार : गुन्हा दाखल

Next Post

मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे वाहतूक कोंडीच्या समस्येतून, मे २०२५ मध्ये सुटका होणार

Next Post
मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे वाहतूक कोंडीच्या समस्येतून, मे २०२५ मध्ये सुटका होणार

मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे वाहतूक कोंडीच्या समस्येतून, मे २०२५ मध्ये सुटका होणार

BreakingNews

मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाविरोधात ठाण्यात बैलगाडी मोर्चा; जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलन

मुंबईकरांना महागाईचा झटका! इंधन दरवाढीपाठोपाठ आता मुंबईकरांचा लाडका वडापावही महागला

‘देऊळ बंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; आता परीक्षा देवाची!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘सूर्या’ बिबट्याचा मृत्यू!

तमिळनाडूच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्री विजय यांच्याकडे गृह खाते

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.