Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे वाहतूक कोंडीच्या समस्येतून, मे २०२५ मध्ये सुटका होणार

वडपे ते ठाणे दरम्यानच्या महामार्गाच्या आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरु आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 12, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे वाहतूक कोंडीच्या समस्येतून, मे २०२५ मध्ये सुटका होणार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे दरम्यानच्या २३ किमीच्या महामार्गाच्या वाहतूक कोंडीला आणि खड्ड्यांना त्रासलेल्या प्रवाशांची आता यातून मे २०२५ मध्ये सुटका होणार आहे. वडपे ते ठाणे दरम्यानच्या महामार्गाच्या आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरु आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामास विलंब झाला असून आतापर्यंत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर आता उर्वरित काम पूर्ण होण्यास मे २०२५ उजाडणार आहे. नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ हा एकूण १४२ किमीचा महामार्ग आहे. या रस्त्याच्या ११८.२० किमीच्या आठपदरीकरण आणि काँक्रीटकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) केले जात आहे. तर वडपे ते ठाणे अशा २३.८०० किमीच्या महामार्गाचे काम एमएसआरडीसीकडून सुरु आहे. एमएसआरडीसीकडून मे. एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पर्सच्या माध्यमातून सप्टेंबर २०२२ मध्ये ११८२ कोटी ८७ लाख रुपये खर्चाच्या कामाला सुरुवात केली आहे. करारानुसार हे काम सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामास विलंब झाला आहे. कामामुळे मागील दोन वर्षांपासून प्रवाशी,वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अशात आता पावसाळ्यात हा महामार्ग खड्ड्यात गेला आहे.

संपूर्ण महामार्गावर खड्डे असल्याने वाहतूक कोंडीत आणखी वाढ होत असून प्रवाशांना, वाहनचालकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागत आहे.वडपे ते ठाणे दरम्यानच्या २५ ते ३० मिनिटांच्या प्रवासासाठी एक-दीड तास वा कधीकधी याहीपेक्षा अधिक वेळ वाया घालवावा लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण आता या कामास काही कारणाने विलंब झाल्याने आता कामाच्या पुर्णत्वास जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तेव्हा आता मे २०२५ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी शुक्रवारी इगतपुरी येथे समृद्धी महामार्गाच्या दौर्यादरम्यान पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान हा महामार्ग आठ पदरी झाल्यास वडपे ते ठाणे अंतर केवळ २५ मिनिटांत पार होईल असा दावा यानिमित्ताने एमएसआरडीसीने केला आहे. त्याचवेळी सध्या २३ किमी दरम्यानचे खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचेही सांगण्यात येत आहे.

  • जून २०२१ मध्ये कामास सुरुवात
  • ११ सप्टेंबर २०२४ जून २०२५
  • सेवा रस्ता ३५.३९ किमी

काँक्रीटीकरण आणि मुख्य रस्त्याच्या कामाचा तपशील

  • मुंबई-नाशिक वाहिनीच्या दोन पदरी सेवा रस्त्याच्या १७.५० किमीच्या काँक्रीटीकरणापैकी १५ किमीचे काँक्रीटीकरण पूर्ण.
  • उर्वरित २.५० किमीचे काँक्रीटीकरण जानेवारी २०२५ मध्ये होणार पूर्ण.
  • नाशिक-मुंबई वाहिनीवरील दोन पदरी सेवा रस्त्याच्या १७.५० किमीच्या काँक्रीटीकरणापैकी १४.५० किमीचे काँक्रीटीकरण पूर्ण.
  • उर्वरित ३ किमीचे काँक्रीटीकरण जानेवारी २०२५ मध्ये होणार पूर्ण.
  • मुंबई-नाशिक वाहिनीवरील चार पदरी मुख्य रस्त्याच्या १२.९१६ किमीपैकी १०.२ किमीचे काम पूर्ण.
  • उर्वरित २.७२६ किमीचे काम फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार पूर्ण.
  • नाशिक-मुंबई वाहिनीवरील चार पदरी मुख्य रस्त्याच्या १२.९१६ किमीपैकी ८.२ किमीचे काम पूर्ण.
  • उर्वरित ४.७१६किमीचे काम काम फेब्रुवारी २०२५ पर्यंत होणार पूर्ण.

२३.८०० किमी आठ पदरीकरण प्रकल्पातील मोठ्या पुलाच्या कामाचा तपशील

  • ०.२०० किमीच्या कळवा खाडीपूलाचे ७२ टक्के काम पूर्ण, उर्वरित काम जानेवारी २०२५ मध्ये होणार पूर्ण
  • ०.०८४ किमीच्या रेल्वेच्या पुलाचे ३५ टक्के काम पूर्ण, उर्वरित काम फेब्रुवारी २०२५ मध्ये होणार पूर्ण
  • ०.३२० किमीच्या वडपे उड्डाणपुलाचे ३९ टक्के काम पूर्ण,उर्वरित काम एप्रिल २०२५ मध्ये होणार पूर्ण
  • ०.८२० किमीच्या कशेळी खाडीपुलाचे ६३ टक्के काम पूर्ण, उर्वरित काम मे २०२५ मध्ये होणार पूर्ण

भुयारी मार्गाच्या कामाचा तपशील

  • ०.७८ किमीच्या वालशिंद भुयारी मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण, सप्टेंबर २०२४ मध्ये उर्वरित काम पूर्ण होणार
  • ०.९८ किमीच्या सोनाळे भुयारी मार्गाचे ५० टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२४ मध्ये उर्वरित काम होणार पूर्ण
  • ०५६ किमीच्या सरवली भुयारी मार्गाचे ५० टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२४ मध्ये उर्वरित काम होणार पूर्ण
  • ०.९० किमीच्या ओवळी भुयारी मार्गाचे ५५ टक्के काम पूर्ण, जानेवारी २०२५ मध्ये उर्वरित काम पूर्ण होणार
  • ०.७८ किमीच्या दिवे गाव भुयारी मार्गाचे ५० टक्के आणि दिवे भुयारी मार्गाचे ४० टक्के काम पूर्ण, जानेवारी २०२५ मध्ये उर्वरित काम पूर्ण होणार
  • ०.७१ किमीच्या येवई भुयारी मार्गाचे ४० टक्के काम काम पूर्ण, मार्च २०२५ मध्ये उर्वरित काम होणार पूर्ण
  • ०.८८ किमीच्या पिंपळास भुयारी मार्गाचे ४० टक्के काम पूर्ण, मार्च २०२५ मध्ये उर्वरित काम होणार पूर्ण
  • ०.५८ किमीच्या मानकोली भुयारी मार्गाचे २० टक्के काम पूर्ण, मे २०२५ मध्ये उर्वरित काम होणार पू्र्ण
  • ०.५७ किमीच्या खारेगाव भुयारी मार्गाचे ० टक्के काम पूर्ण, काम मे २०२५ मध्ये होणार पूर्ण
Previous Post

डोंबिवली : लोकल ट्रेनमधून प्रवासी पडून जखमी

Next Post

वाशी बस स्टॉपवर दरोडा : नवी मुंबईतील प्रवाशांचा फोन भामट्यांनी हिसकावला – १२ हजार रुपये ही लुटले

Next Post
मद्यधुंद चालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून केली मारहाण

वाशी बस स्टॉपवर दरोडा : नवी मुंबईतील प्रवाशांचा फोन भामट्यांनी हिसकावला - १२ हजार रुपये ही लुटले

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.